Wednesday, April 24, 2024
Homeजळगावरोगराई मुक्त केळी उत्पादनासाठी केळी संशोधन केंद्रास बळकटी हवी

रोगराई मुक्त केळी उत्पादनासाठी केळी संशोधन केंद्रास बळकटी हवी

दिलीप भारंबे

चिनावल chinawal ता रावेर –

- Advertisement -

संपूर्ण भारतभर केळी चे आगार समजल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ( Jalgaon district) केळी उत्पादक (Banana growers) गेल्या दोन दशकांपासून नैसर्गिक आपत्तीसह (including natural disasters) केळी वर दरसाल येणाऱ्या नवनवीन रोगराई मुळे (New epidemics) नेस्तनाबूत (breathing) होत आहे. या साठी जळगाव येथे केवळ नावापुरते असलेल्या केळी संशोधन केंद्राला (Banana Research Centre) मूलभूत सोयीसुविधा (Basic amenities) करून देत बळकटी (strengthen) देण्याची तसेच २०१६ साली बंद केलेले करपा अनुदान ( subsidy) तसेच नव्याने केळी उत्पादकांना हादरवून सोडणाऱ्या सी एम  व्ही व्हायरस (CMV virus) ( कुकबंर मोझाॅक व्हायरस ) च्या उच्चाटनासाठी तात्काळ अनुदान (grant) मिळण्याची मागणी जिल्ह्यातील केळी उत्पादकांकडून होत आहे .

जळगाव जिल्ह्याची आर्थिक उलाढाल ही केळी उत्पादनावर अवलंबून असल्याने वेळोवेळी निर्दशनास आले आहे ज्या ज्या वेळी केळी वर नैसर्गिक आपत्ती वा रोगराई मुळे केळी चे उत्पादन घटले त्या त्या वेळी जिल्ह्यावर मंदीचे सावट राहिले आहे आजमितीस केळी च्या आगारात सी एम व्ही ह्या व्हायरस मुळे अवघ्या दोन अडीच महिन्यांपूर्वी लागवड केलेले महागडे केळी बेणे व त्या साठी लागलेली आंतरमशागत व फर्टिगेशन चां झालेला प्रचंड खर्च केळी चे पट उखडून फेकून द्यावे लागत असल्याने उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसून भविष्यातील नियोजन कोलमडले आहे.

  गेल्या महिन्यात दिड महिन्यांपासून सूर्य प्रकाशाची कमतरता व एक सारखा सुरू असलेल्या पावसामुळे केळी बागांमध्ये साचलेल्या पाण्याने केळी चा पोगा व खोडाच्या मूळाला  सळ लागून केळी चे पूर्ण शेत चे शेतावरच सी एम व्ही रोगाचा प्रादुर्भाव वाढला हा व्हायरस संसर्गजन्य असल्यामुळे शेतातील पूर्ण खोंड काढून फेकण्या शिवाय उत्पादकांना पर्याय नाही या मुळे उत्पादकांनी आजपावेतो केळी पट्ट्यात शेकडो उत्पादकांनी प्रचंड खर्च केलेल्या केळी च्या बागांचे पट चे पट अक्षरक्षह फेकून देत आहे या मुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक पूर्णपणे मोडकळीस आला आहे   या साठी शासनाने या आधी सन २०१६ साली बंद केलेले करपा रोग अनुदान व सद्य स्थितीतील सी एम व्ही मुळे झालेली नुकसान पोटी आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे 

      जिल्ह्यातील सुमारे ४०  हजार हेक्टर वर दर आड साल केळी ची लागवड असते मात्र गेल्या काही वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे पारंपरिक केळी पिकावर नवनवीन रोगराई , व्हायरस तर कधी नैसर्गिक वादळ वारा , पाउस , करपा ,चरका या मुळे केळी उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे या साठी जळगाव येथे असलेले केळी संशोधन केंद्रात बदलत्या हवामानाला सूट होईल अश्या केळी वाणांची निर्मिती , करपा ,सी एम व्ही ,बची टाॅप ,या सारख्या रोगराई ला प्रतिबंधा साठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणारे संशोधक व तत्सम कर्मचारी , अद्ययावत प्रयोगशाळा , निर्मिती होणे गरजेचे आहे येथील संशोधन केंद्रात ठराविक कर्मचारी व नेहमीचेच प्रयोग यात बदल करीत राष्ट्रीय स्तरावरील हायटेक संशोधन केंद्राची निर्मिती होण्याची गरज निर्माण झाली आहे .

देशात सर्वाधिक केळी पिकविणाऱ्या बेल्ट मध्ये नेहमी रोगराई चे फक्त नमुने परराज्यातील प्रयोगशाळेत नेले जातात त्यावर काय संशोधन झाले अथवा काय उपाययोजना करायला येतील हे समजत सुद्धा नाही तर  दुसरीकडे आजमितीस केळी रोपं निर्मिती च्या अनेक नामांकित कंपन्या टिश्यू बेणे निर्माण करीत आहे या बेणे निर्मिती कंपन्यांनी निर्मित झालेलं बेण पूर्ण मॅच्युरिटी युक्त व व्हायरस मुक्त आहे की नाही याची खात्री करूनच उत्पादकांना वितरीत केल्यास उत्पादकांचे नुकसान टळू शकते.

   आजमितीस उत्पादकांना अडचणीत आणणाऱ्या सी एम व्ही , करपा , नैसर्गिक आपती या बाबी चां हवामानावर आधारित विमा योजनेत समावेश व्हावा ,तर उत्पादित केळी माल हा देशांतर्गत व देशाबाहेर ही निर्यात होत असल्याने राज्य व केंद्र सरकारने या बाबत सुविधा उपलब्ध करून द्यावी , शेतकऱ्यांसाठी असलेली किसान रॅक नियमित सुरू रहावी , जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावरुन केळी उत्पादकांना रेल्वे वॅगन वेळेवर उपलब्ध होवून वेळेवर केळी चे मोठे बाजारपेठ असलेल्या दिल्ली , आझादपूर , गोरखपूर येथे वेळेवर पोहचण्याची हमी घ्यावी , तसेच शासनाच्या पणन विभागाने केळी ला हमी भाव उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना आखाव्या केळी उत्पादकांना हमी भाव मिळाल्यास वेळोवेळी उत्पादकांना माल आहे तर भाव नाही या परिस्थितीत तग धरता येईल.

ऐन केळी कापणी हंगामात व्यापारी बोर्ड भावा पेक्षा कमी भावाने केळी मालाची मागणी करतात आधीच हतबल , कर्जावू उचल त्यातच केळी बागेत केळी माल जास्त दिवस ठेवू शकत नसल्याने या मजबूरी चां फायदा घेत उत्पादकांची अडवणूक करून निम्मे पेक्षा ही कमी भावाने माल खरेदी करतात या साठी शासनाने योग्य तजविज करणे केळी उत्पादकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

     सर्वाधिक महत्वाचे म्हणजे जळगाव जिल्ह्यातील मुख्य पिक असलेल्या केळी वर वारंवार येणाऱ्या रोगराई व अस्मानी सुलतानी सामना करण्यासाठी जळगाव स्थीत केळी संशोधन केंद्रास अत्याधुनिक , सुसज्ज व नवनवीन सशोधना साठी बळकटी मिळणे ,सी एम व्ही , व्हायरस ग्रस्त उत्पादकांना तात्काळ मदत , करपा ,चरका ,बंची टाॉप व अन्य रोगराई साठी आवश्यक औषधी , फवारणी औजारे या साठी अनुदान द्यावे अशी जोरदार मागणी केळी पट्ट्यात होत आहे

बदलत्या हवामानामुळे पिकांवर होणारे परिणाम विषेष करून केळी पट्ट्यात केळी वर दरसाल येणाऱ्या रोगांपासून बचाव होणे साठी नविन संशोधनातून उपाययोजना संशोधकांनी शोधाव्या केळी संशोधन केंद्रात १२ महिने यावर कार्य सुरू रहावे बेणे निर्मिती कंपन्यांनी उत्पादकांना पूर्ण क्षमतेने वाढ झालेली व व्हायरस मुक्त रोपं पुरवावी या साठी दक्षता घ्यावी शेतकरी केळी उत्पादकांनी पिक पद्धती तर बदल करावा वारंवार एकाच जागी केळी लागवड मुळे तसेच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रासायनिक खतांच्या मात्रा मुळे जमिनीची प्रत घसरत असते उत्पादकांना आपल्या जमिनीचा सामू तपासणी करणे आवश्यक आहे केळी पट्ट्यात ७.५० हा नार्मल सामू आहे अनेक जागी तो ८.५० पर्यंत गेला आहे या मुळे जमीनीतील कस निघून रोगराई ची शक्यता बळावते आहे शेतकऱ्यांनी शेणखत , गोमूत्र चां जमिनीत वापर केला तर जमिनीची प्रत सुधारण्यास हातभार लागेल पर्यायाने पीक सृदृढ घेता येईल

वसंतराव महाजन , केळी समालोचक व कृषी तज्ञ चिनावल ता रावेर .

- Advertisment -

ताज्या बातम्या