Sunday, April 28, 2024
Homeजळगावअलोट गर्दीत बामोशी बाबांची तलवार मिरवणूक

अलोट गर्दीत बामोशी बाबांची तलवार मिरवणूक

मनोहर कांडेकर

चाळीसगाव Chalsigaon

- Advertisement -

हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेल्या येथील पीर मुसा कादरी बाबा उर्फ बामोशी बाबा (Bamoshi Baba’s)तलवारी मिरवणूक (sword procession) आज (दि,७) सायंकाळी ६ वा. भाविकांच्या अलोट गर्दीत (crowd) मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यंदा पूज्य तलवारीचे मानकरी देशमुख घरण्यातील गोकुळ शरद देशमुख हे होते. तलवार माता हिन्दु-मुस्लीम हजारो भाविकांच्या उपस्थितीत ढोला-ताशाच्या गजरात दर्गापर्यंत नेण्यात आली. यंदा सुरगाणा संस्थानचे श्रीमंत कुमार महाराज रोहीत राजे पवार देशमुख यांची खास उपस्थिती होती.

चाळीसगाव येथील संपूर्ण महाराष्ट्रात हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेल्या बामोशी बाबांच्या उरुसालातील भाविकांचे श्रद्धा व आकर्षण असलेली पूज्य तलवार मिरवणूक आज दि,७ फेब्रुवारी रोजी जुन्या नगरपालीके जवळील तलवार भवन येथून भालचंद्र देशमुख यांच्या निवासस्थानापासून सायंकाळी ६ वाजता निघाली.

पूज्य तलवारीचे मानकरी देशमुख घरण्यातील गोकुळ शरद देशमुख यांच्यासह धुनीचे मानकरी विजय देशमुख, प्रशका देशमुख, अनिल देशमुख, जितेद्र देशमुख, गजानन देशमुख, विशाल देशमुख हे तलवार घेवून निघाल्यानतंर हिन्दु-मुस्लीम भाविकांच्या अलोट गर्दीने तलवारी मातेचे दर्शन घेतले. सराफ गल्ली, देशमुख वाडा, राजणगाव दरवाजा मार्ग तलवार दर्गापर्यंत जात असताना, दर्शनासाठी भाविकाची गर्दी वाढत असल्याने पोलिसांची नियोजन अभावी चांगलीच दमछाक दिसुन आली. यावेळी सुरगाणा संस्थानचे श्रीमंत कुमार महाराज रोहीत राजे पवार देशमुख यांनी मिरवणूकीत खास उपस्थिती दिली.

तत्पूर्वी मंगळवारी पूज्य तलवार मातेला संकाळी ६ वाजता शाही स्नान घालण्यात आलेे. त्यानतंर सायंकाळी पुन्हा विधीवत पूजा-अर्चा करुन तलवार मिरवणूकीला ढोला-ताशाच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक दर्गापर्यंत नेण्यात आले. तलवार मातेचे दर्शन घेण्यासाठी आजी-माजी आमदार, नगरसेवक व मोठ्या संख्येने राजकिय, समाजीक क्षेत्रातील मंडळीनी गर्दी केली होती. संकाळपासून तलवार मातेचे दर्शन घेण्यासाठी तलवार भवन येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तर सायंकाळी हजारोच्या संख्येने भाविक मिरणूकीत शामिल झाले. जस-जसी तलवार मिरवणूक दर्गाकडे रवाना झाली, तस-तशी मोठ्या संख्येने गर्दी वाढत होती. शेवटी सायंकाळी ७.३० वाजता दर्गापर्यंत तलवार मिरवणूक पोहचली. याठिकाणी विधीवत पुजा करुन, मिरणूकीची सांगता झाली. संपूर्ण मिरणूकीत आमदार मंगेश चव्हाण यांची उपस्थिती दिसून आली.

पोलिसांचे ढिसाळ नियोजन-

तलावार मिरवणूकीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. परंतू तरी देखील मिरणुकी दरम्यान अनेकांचे मोबाईल व पॉकीट मारले गेल्याचे बोलले जात होते. तलवार मिरवणुकीत चोरट्यांनी हात साफ केल्यामुळे पोलिसांची यंत्रणा कुचकामी ठरल्याचे बोलले जात होते. तर तलवार मिरणुकीसाठी पोलिस प्रशासनाचे ढिसाळ नियोजनामुळे अनेक भाविकाना तलवार मातेचे दर्शन घेता आले नाही. अनेक बड्या नेत्याना मात्र सुव्यस्थीत दर्शन घेता आले. गर्दीच्या कारणामुळे अनेक भाविकांना पोलिसांनी लाठ्या व काठ्यांचा प्रसाद दिला. त्यामुळे भाविकांमध्ये पोलीस प्रशासनाविरोधात संतप्त भावना दिसून आल्यात.

- Advertisment -

ताज्या बातम्या