Saturday, April 27, 2024
Homeनगरबालिकाश्रम रस्त्यावर घरफोडी

बालिकाश्रम रस्त्यावर घरफोडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील अपार्टमेंटमधील बंद घर फोडून चोरट्यांनी एक लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरला. तोफखाना पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पोपटलाल सावज (वय 52) हे वसंतविहार अपार्टमेंटमध्ये राहतात. शुक्रवारी (दि. 22) त्यांचे घर सकाळी बंद होते.

- Advertisement -

चोरट्यांनी सकाळी 11 ते दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील साहित्याची उचकापाचक करून 90 हजार रुपये रोख आणि सोन्यांचे दागिने असा 99 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरला. सावज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या