Thursday, April 25, 2024
Homeराजकीयबाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण; नारायण राणे म्हणतात...

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण; नारायण राणे म्हणतात…

मुंबई | Mumbai

नारायण राणे (Narayan Rane) यांनी गुरुवारी मुंबईत (Mumbai) बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला (Balasaheb Thackeray Smritisthal) भेट दिली. यानंतर काही स्थानिक शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांनी या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्याचं समोर आलं. यावरून भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान या प्रकरणावरून नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार हल्ला केल्याचं पहायला मिळालं.

- Advertisement -

Video : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा..; आमदार लंकेंकडे बोट?

नारायण राणे यांनी म्हंटल की, ‘मी पॅन्ट वर करुन दलदलीतून बाळासाहेबांच्या स्मारकापर्यंत पोहोचलो. बाळासाहेबांबाबत इतका आदर असेल तर ते स्मारक जागतिक दर्जाचे करावे. मी फक्त गोमुत्रासाठी आलो आहे का? ज्याला गोमूत्र शिपंडायचे त्यांनी शिंपडावे. मला कुणासमोर विनम्र व्हावं वाटतं हा माझा प्रश्न आहे. स्मृतीस्थळ शुद्धीकरण करण्याऐवजी मनं शुद्ध करा’ असा सल्लाही यावेळी राणेंनी शिवसेनेला दिला. तसेच, ‘औषधात पैसे खाणाऱ्या या लोकांना हिंदू धर्मात पवित्र असलेले गोमूत्र हातात धरायची पण लायकी नाही’अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

तसेच, नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांवरही आगपाखड केली. पत्रकारिता हा लोकशाहीचा स्तंभ आहे. मी आपल्या पत्रकारितेचा आदर करतो. महाराष्ट्राच्या पत्रकारितेला एक वेगळे स्थान आहे. राज्यकारभार करताना तुमच्या मतांना महत्त्व असते. आम्हालाही मार्गदर्शन मिळते. तुमच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीला फायदा व्हावा अशी अपेक्षा असते. पण सध्या देशातील प्रश्नांबाबत विचारण्याऐवजी पत्रकार मला केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयावर सतत विचारत असल्याचेही ते म्हणाले. आम्ही एवढ्या एकाच विषयासाठी आलो आहोत का? असेही ते म्हणाले.

दरम्यान, शुद्धीकरणाच्या प्रकारावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर परखड शब्दांमध्ये निशाणा साधला. ‘ज्या लोकांनी हे केलं असेल, त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे, एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार आहे. अशा प्रकारे वागणं हे योग्य नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही, ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेऊन त्यांच्या समाधीवर कुणी जात असेल, तर ती समाधी अपवित्र झाली असं सांगता. ही कृती अतिशय अयोग्य आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या