Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकभाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बाळासाहेब सानप

भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बाळासाहेब सानप

नाशिक | Nashik

काही दिवसांपूर्वी घरवापसी केलेल्या सानप यांच्या भाजपने मोठी जबाबदारी सोपवली असून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी त्यांची वर्णी लागली आहे.

- Advertisement -

याबाबतचे नियुक्ती पत्र सानप यांना आज देण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवड केली आहे.

दरम्यान माजी आमदार बाळासाहेब सानप सोमवारी (दि. २१) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घरवापसी केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, भाजपमध्ये काम करताना अनेक कार्यकर्ते जोडले. पक्ष मोठा करण्यासाठी प्रयत्न केला.

मधल्या काळात थोडासा दुरावा झाला पण संघ आणि भाजपचं काम केलेला माणूस दुसरीकडे रमू शकत नाही म्हणून पुन्हा भाजपात प्रवेश करत आहे. येत्या काळात नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपकडून जास्तीत जास्त काम करेन,”. त्यानुसार पक्षाने आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या