Saturday, April 27, 2024
Homeनगरबेकरीला लागलेली आग नियंत्रणात

बेकरीला लागलेली आग नियंत्रणात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर चितळे रोडवरील दत्त बेकरीत शनिवारी सायंकाळी अचानक आग लागली. परंतु, अग्निशामक विभागाची वाहने काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाली. आगीने रौद्ररुप धारा करण्यापूर्वीच अग्निशामक विभागाने 20 मिनिटात ही आग नियंत्रणात आणली. शहरात जुन्या व नव्या बाजारपेठेसह दिल्लीगेट मार्गाला जोडणार्‍या चितळे रोडवर दिवसभर वर्दळ असते.

- Advertisement -

विक्रेत्यांचे स्टॉल, बेकरी, इलेक्ट्रॉनिकसह विविध व्यावसायिकांची दुकाने या रस्त्यावर आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या रस्त्यावरील बेकरीला आग लागली. आग पाहण्यासाठी गर्दी गोळा झाली. ही माहिती मिळताच मनपाचे अग्निशामक विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आग नियंत्रणात आणली. तोपर्यंत रुग्णवाहिका देखील तेथे आग होती. परंतु कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. आग लवकर विझवण्यात आली. परंतु ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या