Wednesday, April 24, 2024
Homeनगरईदनिमित्त नगरमध्ये सामुदायिक नमाज

ईदनिमित्त नगरमध्ये सामुदायिक नमाज

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

नगर शहरात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद रविवारी (दि.10) मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील ईदगाह मैदानमध्ये सकाळी 9.30 वाजता ईदची सामुहिक नमाज मौलाना नदिम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

- Advertisement -

या बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी लागणारे बोकडं खरेदी-विक्रीत जिल्ह्यात कोट्यावधीची उलाढाल झाली. सकाळी 7 वाजल्यापासून शहरातील विविध मशिदीमधून बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. ईदनिमित्त प्रमुख नमाज पठण कोठला येथील ईदगाह मैदानात झाली.

प्रारंभी धार्मिक व्याख्यान, ईदची नमाज, खुदबा व त्यानंतर मुस्लिम बांधवांनी देशात शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना केली. ही ईद तीन दिवसांपर्यंत साजरी करण्यात येते. रविवारी दिवसभर नगर शहरात पावसाची रिपरिप सुरु होती. यामुळे नमाजनंतर मुस्लिम समाज बांधवांना एकमेंकांना शुभेच्छा देण्यासाठी जाता आले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या