Wednesday, April 24, 2024
HomeनगरPhoto : सर्जाराजाला सजविण्याची जय्यत तयारी

Photo : सर्जाराजाला सजविण्याची जय्यत तयारी

अहमदनगर (प्रतिनिधी)

शेतात वर्षभर राबणाऱ्या बळीराजाचे आणि बैलांचे अतुट नाते. शेतात राबणाऱ्या या मूक जिवावर बळीराजा जिवापाड प्रेम करतो. वर्षातून एकदा पोळ्याच्या दिवशी शहरासह गावोगावी बैलांना नदीवर नेऊन खांदामळणी करून आंघोळ घालून पूजन केले जाते.

- Advertisement -

घरोघरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. सोमवारी पोळा सण साजरा केला जाईल. यंदाही सणावर करोनाचे सावट असले तरी बळीराजाने आपल्या जीवाभावाच्या सर्जाराजाला सजविण्याची आपल्यापरीने जय्यत तयारी केली आहे.

बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्त्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत दुकाने लागली आहेत तर घरगुती पुजानासाठी लागणारे मातीचे बैल खरेदी सुरू आहे. पोळ्यानिमित्त घरोघरी पूजनासाठी लागणाऱ्या मातीच्या बैलांना मोठी मागणी असते. सजावटीच्या दुकानात रंगीबेरंगी बेगडी, घोगरमाळ झुल घुंगराच्या माळा, या खरेदीसाठी वर्दळ दिसून आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या