Saturday, April 27, 2024
Homeनगरबहिरवाडीच्या युवकाचा खडकवासला धरणात बुडून मृत्यू

बहिरवाडीच्या युवकाचा खडकवासला धरणात बुडून मृत्यू

नेवासा बुद्रुक |वार्ताहर| Newasa Budruk

नेवासा (Newasa) तालुक्यातील बहिरवाडी (Bahirwadi) येथील शेतकरी सुपुत्राचा पुणे (Pune) येथील खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून या वृत्ताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुल भाऊसाहेब येवले (वय 23) असे या मृत (Death) झालेल्या युवकाचे नाव आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात खरिपासाठी 55 हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा

राहुल येवले हा सॉप्टवेअर इंजिनियर (Software Engineer) असलेला युवक पुणे येथील नामांकित कंपनीत नोकरीस होता, रविवारी सुट्टी असल्याने आपल्या मित्र परिवाराबरोबर तो खडकवासला येथील धरण (Khadakwasla Dam) परिसरात गेला होता. मात्र त्यास पोहता येत नसल्याने तो बाजूलाच बसून होता नंतर कमी पाण्यात उतरला तेथे त्याचा पाय घसरून तोल गेल्याने तो वाहून गेला. इतर मित्रांनी आरडाओरड केली मात्र तो वहात गेला.

मुळा धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरूस्तीसाठी साडेसहा कोटींचा निधी

रविवारी दुपारच्या सुमारास सदरची घटना घडली या घटनेची खबर राहुल यांच्या घरच्याना कळविण्यात आली. रात्रभर पोलिसांचे (Police) शोधपथक राहुलला शोधण्यासाठी कार्यरत होते. अखेर सोमवारी सायंकाळच्या सुमारास राहुलचा मृतदेह (Dead Body) पोलिसांना मिळून आला. राहुल येवले हा देवगड भक्त परिवारातील सदस्य असलेले भाऊसाहेब येवले यांचा चिरंजीव होता.

‘ते’ फक्त फड उभा करायला आणि तमाशा दाखवायला आले

मंगळवारी सकाळी शोकाकुल वातावरणात राहुल याच्यावर बहिरवाडी (Bahirwadi) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल येवले यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, मेव्हणे असा परिवार आहे.

निळवंडे कालवा चाचणी झाली! पुढे काय?

- Advertisment -

ताज्या बातम्या