Friday, April 26, 2024
Homeजळगावविमलबाई भिल यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार जाहीर

विमलबाई भिल यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार जाहीर

जळगाव: jalgaon

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University पहिला ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार’ Poet Bahinabai Chaudhary Gaurav Award ‘वर्डी, ता. चोपडा येथील विमलबाई हिरामण भिल Vimalbai Hiraman Bhil यांना जाहीर झाला आहे.

- Advertisement -

वर्डी शिवारात झालेल्या विमान अपघातात जखमी तरूणीसाठी अंगावरची साडी सोडून त्याची झोळी बनवून रूग्णवाहिकेपर्यंत पोहचविण्यासाठी मदत करून मानवतेचा आदर्श घालून दिल्याबद्दल हा पुरस्कार देवून त्यांचा विद्यापीठाच्या वतीने त्यांचा दि. ११ ऑगस्ट रोजी सन्मान करण्यात येणार आहे.

११ हजार रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि साडी- चोळी देवून हा पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळी विमलबाई भिल यांच्या सोबत अपघातस्थळी मदत करणाऱ्या ११ तरूणांचादेखील स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला जाणार आहे.

दि. ११ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ्या निमित्त होणाऱ्या कार्यगौरव पुरस्कार सोहळयात विमलबाई भिल यांना हा पुरस्कार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिला जाणार आहे. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या