Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedरस्त्यांची वाताहत

रस्त्यांची वाताहत

प्रमोद तुपे

देवगावला (Devgaon) जोडणार्‍या सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून यातील अनेक रस्त्यांच्या साईडपट्टयांनी फुटापर्यंत मजल मारली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहने नादुरूस्त होण्याबरोबरच नागरिकांंची हाडे खिळखिळी होत असून वाहनांचाही खुळखुळा बनला आहे.

- Advertisement -

दुरवस्थेमुळे शेतमाल बाजारपेठेत पोहविण्यास अडचणी येत आहे. रस्ता दुरुस्तीबाबत (road repair) अनेकवेळा मागणी करूनही नागरिकांच्या मागणीला संबंधित अधिकार्‍यांकडून ‘केराची टोपली’ दाखविली जात असल्याने आता या रस्त्याची दैनावस्था फिटणार कधी असा प्रश्न शेतकरी (farmers), चाकरमानी, शेतमजूर व शालेय विद्यार्थ्यांना (students) पडला आहे.

या परिसरातील भरवस फाटा ते देवगाव, कोळगाव ते देवगाव, देवगाव ते मानोरी देवगाव ते शिरवाडे फाटा या रस्त्यांची अतिशय दुरवस्था (bad condition of roads) झाली असून रस्त्यावरील वाढते खड्डे (potholls) अपघाताला (accidents) कारण ठरत आहेत. या परिसरात कांदा (onion), मका (maize), सोयाबीन (soybean), भाजीपाला (vegetables), द्राक्षे (Grapes) आदी शेतमाल बाजारपेठेत पाठवितांना शेतकर्‍यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शालेय विद्यार्थी, चाकरमानी, व्यवसायिक यांनाही देवगावला येण्यासाठी याच रस्त्याने यावे लागते. परंतु रस्त्यावरील वाढते आणि साईडपट्टयांची झालेली दुरवस्था त्यातच अनेक ठिकाणी अरूंद झालेले रस्ते (narrow road) त्यामुळे या रस्त्यावरील प्रवास खडतर बनला आहे. परिसरात देवगाव (degaon) ही व्यापारी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. शाळा, दवाखाने, खते, औषधे, बँका, पतसंस्था, सोसायटी, विजवितरण कार्यालय, टेलिफोन कार्यालय, जनावरांचा दवाखाना, बाजार यासाठी परिसरातील गावातील नागरिकांचा येथे नित्याचा संपर्क असतो. मात्र देवगावला जोडणारेच रस्ते या बाजारपेठेसाठी अडथळा ठरू लागले आहे.

भरवसफाटा ते देवगाव हे अवघे 5 कि.मी. अंतर पार करण्यासाठी तब्बल अर्ध्या तासाचा कालावधी लागतो. लासलगाव (lasalgaon) बाजारपेठेसाठी शेतमाल वाहतूक याच रस्त्याने होते. तसेच मानोरी, कानळद, कोळगाव, धानोरे आदी गावातील शेतकरीही येथे खते, औषधे, बियाणे खरेदीसाठी येत असतात. परंतु या रस्त्याची म्हणजे ‘सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही’ अशी झाली आहे.

रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांना अनेकवेळा निवेदने (memorandum) दिली. मात्र संबंधितांकडून या निवेदनाला केराची टोपली दाखविली जात आहे. त्यामुळे आणखी किती काळ या नादुरूस्त रस्त्यावरून प्रवास करावा लागणार याचे उत्तर मिळत नाही. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे समोरून येणार्‍या वाहनाला साईड अवघड होते. त्यामुळे अनेकवेळा दोन वाहनचालकांमध्ये खडाजंगी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

तर खासगी वाहनचालक शेतमाल वाहतुकीसाठी या रस्त्याला येणे टाळू लागले आहे. यातील अनेक रस्त्यांना बोरीबाभळीचा वेढा पडला असून देवगावकडे येणार्‍या बसगाड्याही बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान (educational loss) होत असून संबंधित विभागाने तत्काळ लक्ष देवून रस्त्यांची दुरुस्ती (road repair) अशी मागणी होत आहे.

देवगावला परिसरातील आठ ते दहा खेडेगावांचा नित्याचा संपर्क येतो. विद्यार्थी व प्रवाशी, खासगी वाहने, बसगाड्या यांच्या नेहमीच्या फेर्‍यामुळे हा मार्ग नेहमी गजबजलेला असतो. मात्र देवगाव ते मानोरी फाटा या रस्त्यावर खड्डयांचे (potholls) साम्राज्य वाढले असून रस्त्याला काटेरी झुडपांचा वेढा पडला आहे. रस्त्यांवरील वाढत्या खड्डयांमुळे वाहन चालविणे झाले आहे.

त्यामुळे रस्त्याचे नव्याने डांबरीकरण होणे गरजेचे आहे, असे पोलिस पाटील भास्कर बोचरे यांनी म्हटले आहे. देवगाव ते भरवस फाटा या 6 कि.मी. च्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या खड्डयांमुळे वाहने नादुरुस्त होत असून टायर पंक्चर होणे हे नित्याचे झाले आहे. समोरून येणार्‍या वाहनाला साईड देणे म्हणजे मोठे अग्निदिव्य ठरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या