Saturday, April 27, 2024
Homeनगरपुणतांब्यातील बस थांब्यांची दुरावस्था

पुणतांब्यातील बस थांब्यांची दुरावस्था

पुणतांबा (वार्ताहर)

परिसरातील पुणतांबा, चांगदेवनगर तसेच येलमवाडी रोडकडे जाणाऱ्या बस थांब्यांची दुरावस्था झाल्यामुळे प्रवाशी वर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

येलमवाडी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या २०१९-२० च्या योजने अंतर्गत बांधलेल्या बस थांब्याचे पत्रे कुणीतरी वाकविले आहे. तसेच बस थांब्यासाठी बांधलेल्या शेडमध्ये खाली फरशी न टाकता केवळ मुरुमच टाकलेला आहे. या ठिकाणी प्रवाशांना बसणे अत्यंत गैरसोयीचे वाटते.

चांगदेवनगर मार्गे जाणाऱ्या बहुतेक बसेस बंद झाल्यामुळे या बस थांब्यावर प्रवाशी वर्गापेक्षा इतर मंडळीच जास्त बसलेल्या असतात. करमणूक म्हणून येथे पत्याचे डाव चांगलेच रंगले जातात. पुणतांबा येथे बस थांब्याच्या शेडचीही दुरावस्था झालेली आहे. शेडमध्ये बऱ्याच वेळा भिकारी बसलेले असतात. काही वेळा मटका घेणारे एजंट सुद्धा त्याचा वापर करतात.

बस थांब्याच्या लगत असलेल्या मुतारी व घाण टाकण्याच्या जागेची वेळेत स्वच्छता केली नाही. दुर्गंधीचा वास येतो. त्यामुळे स्टेशन रोडवर असलेल्या या बस थांब्याचा प्रवासी वर्गाकडून फारसा वापर होत नाही. महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या श्रीरामपूर व कोपरगाव आगाराच्या आगार प्रमुखांनी या बस थांब्याची पाहणी करून त्याची डागडुजी करावी, अशी मागणी बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष संदिप वहाडणे, आरपीआयचे गौतम थोरात तसेच राष्ट्रवादीचे बाळासाहेब तळेकर यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या