Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्यागुवाहाटीत कोणत्या पक्षाचे किती आमदार? बच्चू कडू यांनी दिली महत्वाची माहिती

गुवाहाटीत कोणत्या पक्षाचे किती आमदार? बच्चू कडू यांनी दिली महत्वाची माहिती

गुवाहाटी l वृत्तसंस्था

शिवसेना आणि अपक्ष मिळून ३६ आमदार आज पहाटेला कडक सुरक्षा व्यवस्थेत गुवाहाटीत पोहोचले आहेत. सर्व आमदार आनंदात आहेत. कुणावरही मारहाण झालेली नाही. आणखी काही आमदार आमच्यासोबत जोडले जाऊ शकतात असे प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.

- Advertisement -

ते म्हणाले, शिवसेनेचे ३३ आमदार सोबत आहेत. ३ अपक्ष आमदारदेखील सोबत आहेत. काँग्रेसचेदेखील काही आमदार सोबत येणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. दुपारपर्यंत काही आमदार जॉईन होणार आहेत.

मतदार संघातील कामे झाले पाहिजेत असे प्रामाणिक मत आहे. त्यामुळे सर्व नाराज आमदार एकत्र आले असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या