Friday, May 10, 2024
Homeनगरबचतगटाद्वारे 8 कोटी महिलांना विविध उपक्रमांनी जोडले

बचतगटाद्वारे 8 कोटी महिलांना विविध उपक्रमांनी जोडले

लोणी |वार्ताहर| Loni

राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारही बचतगट चळवळीला प्राधान्य देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला बचतगटाद्वारे 8 कोटी महिलांना विविध उपक्रमांनी जोडले आहे. बचतगटाच्या उत्पादनांनी आता कार्पोरेट ब्रॅन्डींगच्या माध्यमातून बाजारपेठ मिळविण्याची अपेक्षा महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

राज्य शहरी व ग्रामीण जीवनोत्रती अभियान अंतर्गत जनसेवा फाउंडेशन लोणी, पंचायत समिती राहाता, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर, कृषी विभाग व आत्मा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राहाता तालुका सक्षम महिला महोत्सव अर्थात स्वयंसिद्धा यात्रा 2022 प्रदर्शन-विक्री व खाद्य महोत्सवाचे उदघाटन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आशिष येरेकर, कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुशिल कुमार पठारे, जिल्हा व्यवस्थापक सोमनाथ जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका कृषी अधिकारी बापुसाहेब शिंदे, डॉ. हरिभाऊ आहेर, शैलेश देशमुख, ताराबाई खालकर, भाजपचे युवा मोर्चा सरचिटणीस ऋषिकेश खर्डे, सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, अनिल विखे, सोसायटीचे अध्यक्ष अशोक धावणे, प्रकल्प अधिकारी रुपाली लोंढे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सर्व बचत गटातील महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महिलांमध्ये बचतगटाद्वारे जागृती, पर्यायी उत्पादने आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. नाबार्डसह विविध बँका आणि विविध संस्था त्यांना मदत करत आहेत. पुर्वी बचतगटाची स्थापना करावी लागत होती. आता ही एक चळवळ निर्माण आली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समिती राहाता आणि जनसेवा फाउंडेशन लोणी यांनी पुढाकार घेऊन जिल्हातील बचत गटांचे ब्रॅडींग करावे यासाठी निधी उपलब्ध करू देण्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

यावेळी शालिनीताई विखे पाटील यांनी बचत गटांचे उपक्रम, जनसेवा फाउंडेशनची वाटचाल या विषयी माहिती देतानाच महिलांनी केवळ बचत न करता व्यवसाय करून आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिष येरेकर यांनी बचत गटांसाठी सुरु असलेल्या विविध योजनाची माहिती यावेळी दिली.

रविवारपर्यंत सुरु असलेल्या या स्वयंसिद्धा 2022 मध्ये शेती तंत्रज्ञान, बचत गटांनी तयार केलेल्या साहित्य आणि खाद्य महोत्सव आदी उपक्रम सर्वांसाठी खुले आहेत. यावेळी कृषि विभागाच्यावतीने कृषि यांत्रिकीकरण योजनेतून शेतकर्‍यांना ट्रॅक्टर वितरण मान्यवरांनी केले. प्रारंभी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी आपल्या प्रास्ताविकात विविध उपक्रमाची माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या