Friday, April 26, 2024
Homeजळगावजिल्हा रुग्णालयात बाळाची अदलाबदली

जिल्हा रुग्णालयात बाळाची अदलाबदली

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात (District Medical Hospital) सिझर झालेल्या बाळांची अदलाबदल (Baby swapping) झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. डॉक्टरांसह (doctors) तेथील कर्मचार्‍यांच्या (employees) हलगर्जीपणामुळे (laziness) हा संपुर्ण प्रकार झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यामुळे रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथील प्रवीण शांताराम भिल यांच्या पत्नी प्रतिभा भिल व भुसावळ तालुक्यातील उमेश अंबादास सोनवणे यांच्या पत्नी सुवर्णा यांना देखील प्रसुतीसाठी दि. 2 मे रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना सिझर करण्यास सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी बाहेर येवून प्रतिभा यांना मुलगा झाल्याचे सांगितले आणि बाळाला पुढील उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल केले. दरम्यान, प्रतिभा भिल यांच्यासोबतच सुवर्णा सोनवणे यांची सुद्धा सिझर करुन प्रसुती झाली होती. त्यांना देखील मुलगा झाल्याचे सांगण्यात आले.

अर्ध्या तासानंतर दिली मुलगी झाल्याची माहिती

उमेश सोनवणे यांना सुमारे अर्धा तासानंतर मुलगी झाल्याचे सांगितले. बाळ अदलाबदली झाल्यामुळे सोनवणे कुटुंबियांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

बाळांसह आईची होणार डीएनए चाचणी

उमेश सोनवणे यांची पत्नीला देखील मुलगा झाल्याची माहिती प्रसुती गृहातील शिकाऊ नर्स यांनी दिल्यामुळे हा गोंधळ झाला असल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीचे निरसण करण्यासाठी डॉक्टरांनी दोन्ही बाळांसह त्यांच्या आईचे डीएनए चाचणी केली जाणार असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या