Saturday, May 4, 2024
Homeनगरबाभळेश्वरच्या सरपंचपदी विमल म्हस्के उपसरपंचपदी अमृत मोकाशी

बाभळेश्वरच्या सरपंचपदी विमल म्हस्के उपसरपंचपदी अमृत मोकाशी

बाभळेश्वर |वार्ताहर| Babhaleswar

राहाता तालुक्यातील प्रवरा परिसरातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणार्‍या बाभळेश्वर ग्रामपंचायतीच्या

- Advertisement -

सरपंचपदी आ. राधाकृष्ण विखे प्रणित जनसेवा मंडळाच्या विमल म्हस्के यांची तर उपसरपंचपदी अमृत मोकाशी यांची निवड करण्यात आली.

बाभळेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीत आ. राधाकृष्ण विखे प्रणित जनसेवा मंडळाला 14 जागा तर रावसाहेब म्हस्के प्रणित महाविकास आघाडीला 3 जागा मिळाल्या होत्या. ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडीसाठी आयोजित बैठकीत सरपंच पदासाठी विमल म्हस्के यांचा एक तर उपसरपंचपदासाठी अमृत मोकाशी एक असे दोनच अर्ज दाखल केले होते.

सरपंचपदासाठी यांच्या नावाची सुचना संगिता शिंदे यांनी मांडली तर उपसरपंच पदाच्या नावाची सुचना दादासाहेब बेंद्रे यांनी मांडली. या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज राहिल्याने व सरपंच विमल म्हस्के व उपसरपंचपदी अमृत मोकाशी बिनविरोध झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी चोपड़े पी. एस. यांनी जाहीर केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बनसोडे, संगिता शिंदे, वैशाली बनसोडे, राजेंद्र म्हस्के, सतीश गोंडे, अजित बेंद्रे, दादासाहेब बेंद्रे, दिपाली म्हस्के, रेखा तुपे, प्रिया गुंजाळ, निलेश आरगंळे, केशरबाई माळी, राहुल डहाळे, निता कांदळकर, तारामती खोबरे, बबलू म्हस्के, तुकाराम बेंद्रे, नितीन कुलकर्णी, शहाजी कोकाटे, आण्णासाहेब बेंद्रे, शंकर बेंद्रे, साहेबराव म्हस्के, बाळासाहेब बेंद्रे, दादासाहेब म्हस्के, तुकाराम शिंदे, प्रसाद म्हसे, राजेंद्र गदीया, तान्हाजी बेंद्रे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या