Thursday, April 25, 2024
Homeनगरविखेंना मंत्री केले, नंतर ते विसरले - बबनराव घोलप

विखेंना मंत्री केले, नंतर ते विसरले – बबनराव घोलप

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

विखेंना शिवसेनेत आम्ही आणले, राज्यात व केंद्रात मंत्री केले. मात्र ते उपकार विसरले. स्व. बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक कधीही फुटणार नाही, जे फुटले ते मतलबी होते, अशी टीका शिवसेनेचे नवनिर्वाचित शिर्डी लोकसभा मतदार संघ जिल्हा संपर्कप्रमुख व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली.

- Advertisement -

संगमनेर येथे शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी घोलप बोलत होते. श्री. घोलप म्हणाले, शिवसैनिकांची दखल घेण्यासाठी व गद्दारी केलेल्या नेत्यांचा समाचार घेण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर मेळावे घेतले जात आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे तसेही जनतेपासून अंतर ठेवून होते. त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली आहे. शिर्डी लोकसभेत शिवसेनेचा खासदार निवडून तर येईलच मात्र नगर जिल्ह्यात तीन ते चार आमदार देखील आपण निवडून आणू असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. दक्षिण नगर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करत निष्ठावान शिवसैनिकांचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, आमदार योगेश घोलप, कल्याण विधानसभा संपर्कप्रमुख रवींद्र पारकर, नाशिक बाजार समिती संचालक खंदारे, कामगार सेना जिल्हाप्रमुख मुजीब शेख, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, महिला आघाडी प्रमुख शीतलताई हासे, तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, शहरप्रमुख प्रसाद पवार, संगमनेर विधानसभा प्रमुख संजय फड, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, सुरेखा गुंजाळ, आशा केदारी, माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार, माजी उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. दिलीप साळगट, रंगनाथ फटांगरे, नागपूर संपर्क प्रमुख नरेश माळवे, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवासेना शहरप्रमुख अमोल डुकरे, शहर संघटक पप्पू कानकाटे, दीपक साळुंके, सुदर्शन इटप, गोविंद नागरे, संभव लोढा, त्रिलोक कतारी, प्रशांत खजूरे, अनुप म्हाळस, विजू भागवत, अक्षय बिल्लाडे, राजू सातपुते, भारत शिंदे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते. प्रास्तविक नरेश माळवे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी केले. सूत्रसंचालन शिवसेना शहरसचिव प्रथमेश बेल्हेकर यांनी केले व उपस्थितांचे आभार शहरप्रमुख अमर कतारी यांनी मानले. यावेळी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या