Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedरिक्षा चालकांकडे सरकार कधी लक्ष देणार - बाबा आढाव

रिक्षा चालकांकडे सरकार कधी लक्ष देणार – बाबा आढाव

पुणे |प्रतिनिधि| Pune

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा चालकांच्यावतीने विविध मागण्यांसाठी गुरुवारी सप करण्यात आला.

- Advertisement -

रिक्षा पंचायतीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर यानिमित्ताने निदर्शने करण्यात आली ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, की आमचे सरकार तीन चाकी असून मी ड्रायव्हर आहे. मात्र, अशीच तीनचाकी रिक्षा चालवणाऱ्याकडे त्यांचे लक्षच नाही.

रिक्षा चालकांकडे सरकार कधी लक्ष देणार ? असा सवाल जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी यावेळी बोलताना केला.

रिक्षा चालकांसाठी तातडीने कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, लॉकडाऊनच्या काळात दरमहा 14 हजार वेतन मिळावे, चार महिन्यांचा विम्याचा 3 ते 4 हजार रुपये परतावा मिळावा, अशा विविध मागण्या रिक्षा पंचायतीच्यावतीने करण्यात आला.कोरोनाच्या काळात रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय आमच्यावर लादला गेला आहे.

सहा महिने झाले आमचे काम बंद आहे. त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. जसे शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले असेच आमचेही गाड्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे, अशी मागणी रिक्षाचालकांच्यावतीने ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या