Thursday, April 25, 2024
Homeनगरआयुष्यमान योजना सामान्य जनतेला आरोग्य सुविधा देणारी - आ. विखे

आयुष्यमान योजना सामान्य जनतेला आरोग्य सुविधा देणारी – आ. विखे

राहाता |वार्ताहर| Rahata

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आयुष्यमान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी सामान्य जनतेला आरोग्य सुविधा देणारी योजना असून देशातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ पोहचविण्याची इच्छा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली होती. मात्र मोदींवर टीकास्त्र सोडणार्‍या राज्यातील महाआघाडी सरकारने आपण जनतेसाठी काय काम केले? कोणत्या योजना सामान्य जनतेसाठी घोषित केल्या, असा सवाल करीत महाआघाडी सरकारने राज्यातील शेतकर्‍यांना शंभर टक्के कर्जमाफी करावी, अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

- Advertisement -

राहाता येथील विरभद्र मंदिराच्या प्रांगणात शहरातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना ओळखपत्र व आरोग्य कार्डचे वितरण आ. विखे पाटील व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा ममता पिपाडा, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, भाजपाचे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. रघुनाथ बोठे, डॉ. राजेंद्र पिपाडा, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, नितीन कापसे, सुवर्णकार समाजाचे जिल्हाध्यक्ष समीर माळवे, भाजपा दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चौधरी, बाळासाहेब डांगे, बाळासाहेब जपे, नंदकुमार जेजूरकर, भाजपा युवा तालुकाध्यक्ष सतीश बावके, वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ, श्री. सय्यद, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, डॉ. गोकुळ घोगरे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आ. विखे पाटील म्हणाले की, सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्य सुविधा मिळावी यासाठी आर्थिक सहाय्य देणारी आयुष्यमान भारत योजना सुरू करून सामान्य माणसाला नवसंजीवनी देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्या या कामाचे मी सर्व जनतेच्यावतीने अभिनंदन करतो. या योजनेद्वारे गरीब व वृद्ध जनतेला आजारपणासाठी सुमारे पाच लाख रुपयांची मदत मिळणार आहे. ही योजना जगातील सर्वात मोठी आरोग्यविषयक सुविधा देणारी असून शेवटच्या घटकापर्यंत हा लाभ पोहचविण्याची इच्छा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात प्रथमच आपण जिल्ह्यातील 38 हजार लाभार्थींना सक्षमपणे या योजनेचा लाभ पोहोचविण्याचे काम केले आहे. पंतप्रधान मोदींनी सुमारे 112 कोटी नागरिकांना लसीकरण करून जगात सर्वाधिक लसीकरण मोहीम राबवित भारतीय जनतेला या महामारीत दिलासा दिला आहे. करोनामध्ये मयत झालेल्या कुटुंबांना 50 हजार रुपयांची मदत, कोविडमध्ये पालकत्व हरपलेल्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक खर्च मदत, गरिबांना मार्च 2022 पर्यंत मोफत धान्य पुरवठा याशिवाय ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना तसेच अपंगांसाठी योजना सुरू करून भारतातील सामान्य जनतेला आधार देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. या सर्व योजना खा. डॉ. सुजय विखे व आपण राहाता तालुक्यासह जिल्ह्यात सक्षमपणे राबवित आहोत.

मोदी काय काम करतात? अशी मोदींवर टीका करणार्‍या आघाडी सरकारने सामान्य जनतेसाठी कोणत्या योजना सुरू केल्या आहे? एसटी कामगार व शेतकरी आत्महत्या करतात. त्यांच्यासाठी आपण काय केले, असा सवाल करीत कोविड महामारीमध्ये दोन वर्षांपासून आर्थिक स्थितीने त्रस्त झालेल्या राज्यातील नागरिकांच्या घरपट्टी कमी केल्या का असा सवाल करीत राज्य सरकारने शेतकर्‍यांची 100 टक्के कर्जमाफी करावी, अशी मागणी करताना राज्य सरकार फक्त केंद्राकडे बोट दाखवायचे काम करीत असून फक्त धन्यवाद जाहिराती काढून जनतेची फसवणूक करीत आहे, अशी टीका करत राज्याच्या जनतेचा विश्वास फक्त मोदींवर आहे या सरकारवर नाही, असेही आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

अण्णासाहेब म्हस्के म्हणाले की, केंद्राने सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. राज्यात अद्याप कुठेही योजना सुरू झाल्याची नोंद नाही. सामान्य जनतेसाठी मूलभूत आजारांमध्ये मदत देणारी अशी कृती कधीही योजना अद्याप राबवली गेली नाही. राज्यातील सरकारने अद्याप अशी कोणतीही मूलभूत योजना केलेली नाही. या योजनेची अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आ. विखे यांनी प्रयत्न केले आहेत.

यावेळी प्रास्ताविक मुकुंद सदाफळ यांनी तर अ‍ॅड. रघुनाथ बोठे, नितीन कापसे, राजेंद्र निकाळे यांनी या योजनेसंदर्भात माहिती दिली. यावेळी नगरसेवक विजय सदाफळ, सलीम शाह, नगरसेविका सविता सदाफळ, अनुराधा तुपे, डॉ.स्वाधीन गाडेकर, मुन्ना सदाफळ, राहुल सदाफळ, समीर माळवे, संजय सदाफळ, अतुल बोठे, गणेश सदाफळ, मिलिंद बनकर, विजय शिंदे यांच्यासह शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार कैलास सदाफळ यांनी मानले. राहाता शहरातील सुमारे तीन हजार लाभार्थींना यावेळी या योजनेचे ओळखपत्र सुपूर्त करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या