Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआयुष्यमान भारत योजना : इ-कार्डसाठी आजपासून मोहीम

आयुष्यमान भारत योजना : इ-कार्डसाठी आजपासून मोहीम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व ग्रामपंचायत विभागांमार्फत आयुष्यमान भारतचे ई-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढण्यासाठी पुढील 15 दिवस विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात या योजनेचे सोळा लाख लाभार्थी नोदणीकृत असले तरी आता पर्यंत केवळ चार लाखाच्या जवळपास लाभार्थ्यांंनाच हे कार्ड मिळाले आहे. म्हणुनच ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी केले आहे.

- Advertisement -

इ-कार्डच्या माध्यमातून 1 हजार 209 आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया होणार असल्याने नागरिकांनी मोफत ई-कार्ड काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थ्यांना रुपये पाच लाखांपर्यंत वैद्यकीय संरक्षण मिळते. या योजनेंतर्गत ई-कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्याकडे असलेले आयुष्यमान भारतचे पत्र, रेशन कार्ड किंवा आधार कार्ड ही कागदपत्रे घेऊन जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय अथवा आपले सरकार सेवा केंद्रात जावे.

त्याचप्रमाणे स्वतःचा मोबाईल क्रमांक जवळ ठेवून त्यावर आलेला ओटीपी क्रमांक हा नोंदणी करतेवेळी देण्यात यावा, जेणे करून ई-कार्ड त्वरित तयार होऊन विनामूल्य उपलब्ध होईल. यासाठी ग्रामपंचायत कार्यालय अथवा आपले सरकार सेवा केंद्र येथे पैशांची मागणी केल्यास त्याबाबत जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात तक्रार करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या