Thursday, April 25, 2024
Homeनगरअयोध्या राम मंदिर उभारणी; पुढील योजनांबाबत आज दिल्लीत बैठक

अयोध्या राम मंदिर उभारणी; पुढील योजनांबाबत आज दिल्लीत बैठक

देवगडफाटा |वार्ताहर Devgad Phata

अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराच्या पुढील योजनांच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी

- Advertisement -

विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक आज दि.10 व उद्या 11 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होत असून श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांना या बैठकीचे निमंत्रण आले असून ते या बैठकीसाठी सोमवारी सायंकाळी विमानाने रवाना झाले आहेत.

या बैठकीच्या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे, केंद्रीय मंत्री अशोक तिवारी, उपाध्यक्ष जिवेश्वर मिश्र यांनी आपल्या स्वाक्षरीद्वारे भास्करगिरी महाराजांना निमंत्रण दिले आहे. निमंत्रण पत्रात म्हटले आहे की प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्या येथील नियोजित मंदिराचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.5 ऑगस्ट रोजी झाला. त्यामुळे संपूर्ण विश्वातील हिंदू समाजामध्ये नवीन उत्साह निर्माण झाला असून मंदिर निर्माणचे कार्यही हळूहळू प्रगती करीत आहे.

अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्मितीच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी दि.10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता बैठकीचे पहिले सत्र होणार आहे. त्यानंतर बुधवार दि. 11 नोव्हेंबर रोजी बैठकीचे दुसरे सत्र सकाळी 9 वाजता होणार आहे. मंदिर निर्मितीसाठी अजून काय उपाययोजना करता येईल या करिता सूचना करण्यासाठी दिल्ली येथे होणार्‍या नियोजन बैठकीस आपण उपस्थित राहून सूचना कराव्यात अशी विनंती निमंत्रण पत्रात भास्करगिरी महाराज यांना केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या