Saturday, April 27, 2024
Homeनगरराम मंदीराच्या शुभारंभासाठी भास्करगिरी महाराज यांना निमंत्रण

राम मंदीराच्या शुभारंभासाठी भास्करगिरी महाराज यांना निमंत्रण

देवगडफाटा|वार्ताहर|Devgad phata

अयोध्या येथे 5 ऑगस्ट रोजी होत असलेल्या राम मंदिर शिलान्यास सोहळ्यास श्रीक्षेत्र देवगडचे महंत व पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त भास्करगिरी महाराज यांना विशेष निमंत्रित म्हणून निमंत्रित करण्यात आले असून ते तीन तारखेला अयोध्येस रवाना होणार आहेत. भास्करगिरी महाराज रामजन्मभूमी आंदोलनावेळी महाराष्ट्र कार सेवा समितीचे प्रमुख होते.

- Advertisement -

राम जन्मभूमी अयोध्या येथे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिराच्या उभारणी कार्याचा भूमिपूजन शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमासाठी राम जन्मभूमी न्यासाच्या ट्रस्टच्यावतीने भास्करगिरी महाराजांना राम जन्मभूमी आंदोलनाचे वेळी महाराष्ट्र कार सेवा समितीचे प्रमुख या नात्याने विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातून न्यासाचे विश्वस्त असलेले गोविंददेव गिरीजी व्यास यांच्यासह भास्करगिरी महाराज यांना निमंत्रित केल्यामुळे तालुक्यासह महाराष्ट्र राज्यभरातील भक्तगण व राम भक्तांमधून आनंद व्यक्त होत आहे. तीन ऑगस्ट रोजी भास्करगिरी महाराजांसमवेत विश्व हिंदू परिषदेचे अ‍ॅड. सुनील चावरे हे देखील अयोध्येला जाणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या