Friday, April 26, 2024
Homeजळगावअ‍ॅक्सॉन ब्रेन कोविड हॉस्पिटलची मान्यता रद्द

अ‍ॅक्सॉन ब्रेन कोविड हॉस्पिटलची मान्यता रद्द

जळगाव – Jalgaon :

मान्यता रद्द केली असतांना देखील अ‍ॅक्सॉन ब्रेन डेडीकेटेड हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना दाखल केल्याचे आढळून आले.

- Advertisement -

तसेच क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण रुग्णालयात उपचार घेतांना आढळून आल्याने जिल्हा शल्य चिकीत्सकांनी या हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले आहे.

शहरातील अ‍ॅक्सॉन बे्रन डेडीकेटेड हॉस्पिटलच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकार्‍यांडे प्राप्त झाल्या होत्या. या हॉस्पिटलची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले होते.

त्यानुसार भरारी पथकाने या हॉस्पिटलची चौकशी केली होती. यात त्यांना या हॉस्पिटलला 15 बेडची परवानगी असतांना याठिकाणी 24 बाधित रुग्ण आढळून आले. तसेच रुग्णालयातील डॉक्टरर्स, नर्स व इतर कर्मचार्‍यांनी पीपीई किट परिधान न करता उपचार करतांना आढळून आले.

ऑक्सिजनचा वापर आवश्यकतेपेक्षा अधिक होत असल्याने त्यामुळे जिल्ह्यात त्याचा तुटवडा निर्माण होत असल्याने त्याला हॉस्पिटलला जबाबदार धरण्यात का येवू नये यासह 17 जानेवारी रोजीच्या पत्रानुसार हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात आली होती.

मात्र तरी देखील रुग्णालयाने 17 जानेवारी ते 21 फेब्रुवारीपर्यंत रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी दाखल केल्याचे तपासणी आढळून आले. या सर्व करणांमुळे या हॉस्पिटलची मान्यता पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. चव्हाण यांनी काढले आहे.

तसेच सद्याच्या स्थितीत रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज पॉलिसीनुसार डिस्जार्च करावेत असे देखील आदेशात नमूद केल आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या