अ‍ॅक्सिस बँकेतील कॅशिअरने महिलेची केली पाच लाखांत फसवणूक

jalgaon-digital
2 Min Read

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी

अ‍ॅक्सिस बँकेतील (Axis Bank) कॅशिअर (Cashier) तथा डेस्क ऑफीसरने एफडीची(FD) बनावट पावती (Fake receipt) देवून एका महिलेची (woman) पाच लाखात फसवणूक (Cheating) केल्याची घटना नंदुरबार येथे घडली. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस (Police) ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार येथील जळका बाजार चौकात राहणारे नंदिनी मनोहर चौधरी (Nandini Manohar Chaudhary) या महिलेच्या घरी 20 मार्च 2018 रोजी नंदुरबार येथील अ‍ॅक्सिस बँकेतील (Axis Bank) डेस्क ऑफीसर (Desk officer) दिनेश राजेंद्र सोनार (Dinesh Rajendra Sonar) हे आले यावेळी त्यांनी बँकेची एफडी तयार करून देण्यासाठी नंदिनी चौधरी या महिलेकडून पाच लाखाचा धनादेश घेतला तसेच अक्सिस बँकेची पाच लाखाची एफडी (FD) झाल्याची पावती दिनेश सोनार यांनी दिली होती.

परंतु ही बाब चार वर्षानंतर एफडीची रक्कम काढण्यासाठी गेल्यानंतर उघडकीस आली आहे. नंदिनी चौधरी या महिलेने 25 मार्च 2021 रोजी बँकेत जावून अ‍ॅक्सिस बँकेच्या एफडीची पावती डेस्क ऑफीसर राहुन दुसाने (Rahun Dusane) यांना दाखविले.

त्यावेळी त्यांनी सदर पावती पाहिल्यानंतर ही खोटी (False) असल्याचे सांगितले ही पावती तुम्हाला कोणी दिली, असे विचारल्यावर नंदिनी चौधरी महिलेने सांगितले की, 20 मार्च 2018 रोजी बँकेचे डेस्क ऑफीसर दिनेश राजेंद्र सोनार यांनी दिली. त्यावेळी दिनेश सोनार यांना फोन करन विचारले असता कोणाला काही सांगू नका, मी तुम्हाला भेटतो, असे सांगून भेटले असता सध्या माझ्याकडे पैसे नसून पैसे आल्यावर परत करतो. परंतु अद्यापर्यंत पैसे परत केलेले नाही.

यामुळे अ‍ॅक्सिस बँकेच्या एफडीची बनावट पावती देवून नंदिनी मनोहर चौधरी या महिलेची बँकेतील तत्कालीन डेस्क ऑफीसरने पाच लाखात फसवणूक (Cheating) केली आहे. याबाबत निर्मलकुमार हर्षदराय सोलंकी यांनी नंदुरबार शहर पोलीस( police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अ‍ॅक्सिस बँकेतील तत्कान डेस्क ऑफीसर तथा कॅशिअर दिनेश राजेंद्र सोनार याच्याविरूध्द भादंवि कलम 420, 468, 419 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करीत आहेत. याप्रकारामुळे एकच खळबळ उडाली असुन याबाबत पैसे सुरक्षीत कुठे ठेवायचे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *