कुर्‍हाडीचा धाक दाखवून दागिने व बोकड घेऊन चोरटे पसार

jalgaon-digital
2 Min Read

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

अज्ञात तीन चोरट्यांंनी (Theft) दगडाच्या सहाय्याने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आजी व नातवाला कुर्‍हाडीचा (Axe Fear) धाक दाखवून आजीच्या अंगावरील सुमारे सात ग्रॅम वजनाचे दागीने (Jewelry) ओरबाडून काढून घेतले. तसेच सोन्याच्या दागिन्यांसह (Jewelry) एक बोकड घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना राहुरी तालुक्यातील मुळानगर (Mulanagar) येथे दिनांक 7 मे रोजी घडली आहे.

यंदा 2600 कृषी निविष्ठा तपासण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट!

रुबीना अहमद शेख, वय 65 वर्षे, या राहुरी (Rahuri) तालुक्यातील मुळानगर येथे त्यांच्या नातवासह राहत आहेत. दिनांक 7 मे रोजी पहाटे 1 वाजेच्या दरम्यान अज्ञात तीन चोरट्यांनी रूबीना शेख यांच्या घराचा दरवाजा दगडाच्या (Stone) सहाय्याने तोडून आत प्रवेश केला. आणि रुबिना शेख यांना म्हणाले की, तु आरडा ओरड केली. तर तुला व या मुलाला कुर्‍हाडीने मारुन टाकु, असा दम दिला. त्यानंतर त्यांनी घरातील सामानाची उचकापाचक सुरु करुन पैसे मागीतले.

मालमत्ता व दायित्वासह भिंगारला स्वीकारण्याचा मनपा प्रशासनाचा प्रस्ताव

त्यावेळी दरोडेखोरांनी (Robbers) रूबिना शेख यांच्या गळ्यातील मनी, नाकातील मुरनी तसेच कानातील दोन सोन्याची फुले व कुडके असे सुमारे सात ग्रॅम वजनाचे व 40 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने (Gold Jewelry) जबरदस्तीने ओरबाडून काढुन घेतले. त्यानंतर ते घरातुन बाहेर जात असतांना घराबाहेरील एक पाच हजार रुपए किंमतीचा बोकड असा एकूण 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल घेवुन पसार झाले.

नूतन कार्यकारी अधिकार्‍यांच्या अनोख्या कार्यपद्धतीमुळे कर्मचार्‍यांनी घेतली धास्ती

घटनेनंतर रूबिना अहमद शेख यांनी राहुरी पोलिस ठाण्यात (Rahuri Police Station) धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. 464/2023 भादंवि कलम 394, 457, 506, 34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

राजमाता जिजाऊ पतसंस्था अपहार प्रकरण; अध्यक्ष भाऊसाहेब येवले पोलिसांना शरण

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *