Friday, May 10, 2024
Homeनगरगुंजाळेत टक्केवारीवरून कुर्‍हाडीने वार; गुन्हा दाखल

गुंजाळेत टक्केवारीवरून कुर्‍हाडीने वार; गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या कामामधून टक्केवारी देण्यास नकार दिला. या कारणावरुन दीपक नवले यांच्यावर कुर्‍हाडीने वार करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना दि. 13 जून रोजी राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे घडली.

- Advertisement -

सौ. सिमा दीपक नवले रा. गुंजाळे, ता. राहुरी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 13 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सौ. सिमा नवले व त्यांचे पती दीपक नवले हे त्यांच्या घरासमोर उभे होते. तेव्हा आरोपी तेथे आले आणि नवले यांना म्हणाले, तुम्ही गुंजाळे गावातील ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या कामामधून आम्हाला टक्केवारी द्या. त्यावेळी सिमा नवले व दीपक नवले त्यांना म्हणाले, तुम्हीपण गावात काम केलेले आहे. तुम्हालापण पैसे मिळाले आहेत. आम्ही टक्केवारी देणार नाही. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी नवले यांच्यावर कुर्‍हाडीने वार करून मारहाण केली. सिमा नवले यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे गंठण काढून नेले.

घटनेनंतर सौ. सिमा नवले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबासाहेब एकनाथ चेंडवाल, संदीप दिलीप चेंडवाल, दिलीप एकनाथ चेंडवाल, अशोक ऊर्फ पप्पू बाबासाहेब चेंडवाल सर्व रा. गुंजाळे, ता. राहुरी या चारजणांवर मारहाण व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार साईनाथ टेमकर करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या