Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपेठ येथील विद्यालयात वाहतुक सुरक्षा अभियानावर प्रबोधन

पेठ येथील विद्यालयात वाहतुक सुरक्षा अभियानावर प्रबोधन

पेठ l Peth (वार्ताहर)

प्रादेशिक परिवाहन विभाग (आरटीओ) व पेठ पोलीस ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने वाहतुक सुरक्षा सप्ताह अभियान अंतगत प्रादेशिक परिवाहन अधिकारी कळसकर व सहा. परिवाहन अधिकारी विनय अहिरे यांचे संकल्पनेतून महाविद्यालयीन विद्यार्थी, वाहनधारक, पादचारी यांच्यात वाहनाचे अपघात टाळणेसाठीची उपाय योजना, नियम, हक्क व कर्तव्य यांची माहिती होणेसाठी व त्यातच किशोरवयीन विद्यार्थी यांना प्रबोधन करणेसाठी जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयतील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना पेठ फ्लाईंग स्कॉडचे वाहतुक निरीक्षक उमेश तायडे यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.

- Advertisement -

या वेळी जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालच्या प्राचार्या शिरोडे, उप प्राचार्या पवार यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या