Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती

वावी। वार्ताहर vavi

सिन्नर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ACB वावी Vavi परिसरात भ्रष्टाचार विरोधी अभियानातंर्गत जनजागृती Public awareness under anti-corruption campaign करण्यात आली.नाशिक परिक्षेत्रात या अभियानाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती अभियान राबवण्यात आले.

- Advertisement -

याच पार्श्वभुमीवर वावी येथेही हा उपक्रम घेण्यात आला. समाजाचा विकास व भ्रष्टाचार, भ्रष्टाचार प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजना, भ्रष्टाचार प्रतिबंध संदर्भात मी काय करु शकतो?, भ्रष्टाचार समाजाला लागलेली एक कीड, भ्रष्टाचार संपवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, भ्रष्टाचार मुक्त भारत माझे स्वप्न या विषयांवर परिसरातील शाळा, महाविद्यालयांत ऑनलाइन निबंध स्पर्धा घेतल्या आल्या.

या सप्ताहा दरम्यान विभागाकडून वावी पोलिस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालयांना भेट देऊन स्थानिक गावकर्‍यांची लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याबाबत चर्चा करून जनजागृती करण्यात आली.

शासकीय अधिकारी, सेवकांकडून कामाच्या बदल्यात पैशाची मागणी होत असल्यास विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बस स्थानक परिसरात नागरिकांना एकत्र जमवून अनिल भालेराव, पोलिस हवालदार प्रणव इंगळे, अनंत खैरे, प्रशांत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या