Thursday, April 25, 2024
Homeनाशिकगीताई फाऊंडेशनतर्फे भांडवलकर यांना पुरस्कार

गीताई फाऊंडेशनतर्फे भांडवलकर यांना पुरस्कार

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

गीताई फाऊंडेशन नाशिकतर्फे सामाजिक चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या महिला कार्यकर्तीला गेली तीन वर्षे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

- Advertisement -

यावर्षीचा गीताबाई देवराम आहिरे स्मृती साथी सोनी सोरी यल्गार सन्मान (२०२०) पुणे येथील भटक्या विमुक्तांसाठी लढणा-या सामाजिक कार्यकर्त्या वैशाली राजू भांडवलकर यांना घोषित करण्यात आला आहे. शनिवारी (दि.१९) सायंकाळी ६ वाजता, होली क्राॅस चर्च, त्र्यंबक नाका नाशिक येथे हा पुरस्कार वितरण होत आहे.

यापुर्वी दिप्ती राऊत (नाशिक), सुनिता भोसले (शिरूर) व मा. दुर्गा गुडिलू (मुंबई) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वैशाली भांडवलकर या भटक्या विमुक्तांसाठी अहोरात्र झटत आहेत.

त्यांच्या या गरूड भरारीचं कौतुक करण्यासाठी व त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी हा सन्मान देण्यात येत आहे. ज्येष्ठ समाजसेवी मेधाताई पाटकर आणि गुरूमितसिंग बग्गा माजी उप महापौर, मनपा नाशिक यांच्या मुख्य उपस्थितीत नाशिक येथे हा पुरस्कार वितरण संपन्न होत आहे.

सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व रोख रूपये अकरा हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तरी नाशिककर नागरिक, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आदींनी या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन गीताई फाऊंडेशनच्यावतीने अध्यक्ष मनोहर आहिरे, विश्वस्त प्रकाश संसारे व अनिता पगारे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या