Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या अविनाश साबळेची दमदार कामगिरी; पॅरीस ऑलिम्पिकसाठी ठरला पात्र

महाराष्ट्राच्या अविनाश साबळेची दमदार कामगिरी; पॅरीस ऑलिम्पिकसाठी ठरला पात्र

मुंबई | Mumbai

पॅरीस (Paris) येथे २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी (Olympic Games) महाराष्ट्रातील (Maharashtra) बीड जिल्ह्यातील (Beed District) अविनाश साबळे (Avinash Sable) पात्र ठरला आहे…

- Advertisement -

Nashik : भाजपमध्ये मोठे फेरबदल; शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बच्छाव, वाघ यांची नियुक्ती

अविनाश हा लांब पल्ल्याचा धावपटू (Runner) असून त्याने नुकतीच सिलेसिया डायमंड लीग २०२३ (Silesia Diamond League 2023) अॅथलेटिक्स मीटमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली. त्यामुळे आता त्याला जगभरातील क्रीडा विश्वाचे लक्ष लागलेल्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी (Paris Olympics) आवश्यक पात्रता पूर्ण करण्यात यश आले आहे.

Nashik News : सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच; विद्यार्थी, चाकरमान्यांचे मोठे हाल

नुकतेच पोलंड येथे पार पडलेल्या सिलेसिया डायमंड लीग २०२३ अॅथलेटिक्स मीटमध्ये अविनाशने पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेचे अंतर ८.११.६३ इतक्या वेळेत पूर्ण करत सहावे स्थान पटकावले. यामुळे त्याला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर आता पॅरीस येथे २०२४ मध्ये होणाऱ्या अॅथलेटिक्स स्पर्धेत (Athletics Competition) अविनाश सहभागी होणार आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दरम्यान, अनिवाश साबळे याने यापूर्वी टोकियो (Tokyo) येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये (Commonwealth Games) सहभाग घेतला होता. त्यावेळी त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर आता पॅरीस येथील स्पर्धेसाठी अविनाशची निवड झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या