Saturday, April 27, 2024
Homeनगरअविनाश घुले सभापतीपदाचे दावेदार

अविनाश घुले सभापतीपदाचे दावेदार

अहमदनगर (प्रतिनिधी) –

महापालिकेच्या स्थायी समितीत आज बुधवारी नव्याने आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. नव्या सदस्यांची नावे पाहता

- Advertisement -

राष्ट्रवादीचे अविनाश घुले हे सभापती पदाचे दावेदार असतील अशी चर्चा सुरू झाली आहे. आता सभापती पदाचा कार्यक्रम कधी निघणार याकडे नगरकरांच्या नजरा लागून आहेत.

1 फेब्रुवारीला 8 सदस्य निवृत्त झाल्यानंतर त्या पक्षाचे तेवढेच सदस्य नियुक्त करण्यासाठी आज महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत गटनेत्यांनी बंद पाकिटात नवनियुक्त सदस्यांची नावे दिली. त्यांची नावे महापौर वाकळे यांनी घोषित केली.

नव्याने नियुक्त केलेल्या सदस्यांची नावे पाहता सभापी पदासाठी राष्ट्रवादीचे अविनाश घुले हे दावेदार मानले जात आहेत. महाविकास आघाडीचा दावा करत शिवसेना सभापती पदावर दावा करू शकते, पण जूनमध्ये महापौर पदाची खांदेपालट होणार आहे. महपौर आरक्षित असल्याने ते शिवसेनेच्या वाट्याला जावू शकते, त्यामुळे स्थायी समितीचे सभापती पद शिवसेनेला जाणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

हे झाले मेंबर…

शिवसेना : प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, रिता भाकरे राष्ट्रवादी : अविनाश घुले, समद खान बसपा : मुदस्सर शेख भाजप : रवींद्र बारस्कर, वंदना ताठे

बसपाकडून पुन्हा शेख

बसपाकडून माजी सभापती मुदस्सर शेख हे पुन्हा स्थायी समितीत गेले आहेत. दीड वर्षे सभापती पद भुषविल्यानंतर दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केल्याने ते निवृत्त झाले होते. स्थायी समितीत जाण्याकरीता अश्‍विनी जाधव याही इच्छुक होत्या. पण गटनेता असलेले शेख यांनी स्वत:चेच नाव देत पुन्हा स्थायीत एन्ट्री केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या