Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रअविनाश भोसलेंना ईडीचा दणका

अविनाश भोसलेंना ईडीचा दणका

पुणे |प्रतिनिधी| Pune

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांची सुमारे 4 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली आहे. अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीची ही जमीन असून त्यावर सुरु असणारं बांधकाम बेकायदेशीर असल्याच्या प्रकरणी ईडी चौकशी करत आहे.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून उद्योजक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. गेल्या महिन्यात त्यांची तब्बल 5 तास चौकशी करण्यात आली होती. आर्थिक अफरातफर प्रकऱणात ही चौकशी सुरु असून भोसले यांनी बेकायदा पद्धतीने काळ्या पैशांचा व्यवहार केला असल्याचा संशय ईडीला आहे.

पुण्यातील एका सरकारी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करून अविनाश भोसले यांच्या कंपनीकडून बांधकाम केलं जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकऱणाची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान समोर आलेल्या इतर अनेक व्यवहारांचीदेखील ईडीकडून तपासणी केली जात आहे.

कोण आहेत अविनाश भोसले

गरिबीतून सुरुवात करून आपलं साम्राज्य उभे करणारे उद्योगपती म्हणून अविनाश भोसलेंची ख्याती आहे. एका रिक्षावाला म्हणून आपली कारकीर्द सुरू करणार्‍या भोसलेंनी काही वर्षातच कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवली आहे. एबीआयएल या ग्रुपचे ते मालक असून मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या