Thursday, April 25, 2024
Homeजळगावआव्हाणे ग्रा.पं. सदस्याच्या पत्नीची आत्महत्या

आव्हाणे ग्रा.पं. सदस्याच्या पत्नीची आत्महत्या

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

तालुक्यातील आव्हाणे येथील विवाहितेने रााहत्या घरातील वरच्या मजल्यावर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सकाळी 11 वाजता उघडकीला आली.

- Advertisement -

ग्रामपंचायत नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे येथील नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य इमाम युनूस पिंजारी हे पत्नी शबनम बी इमाम पिंजारी (वय 25) , भाऊ आणि आईवडीलांसह एकत्र कुटूंबात राहतात.

इमाम पिंजारी हे बांधकाम ठेकेदारीचे काम करतात. आज सकाळी इमाम पिंजारी आणि त्यांचे भाऊ कामावर निघून गेले. त्यावेळी शबनमबी पिंजारी आणि जेठाणी घरी एकट्याच होत्या. जेठाणी ह्या खालच्या घरात काम करत असतांना शबनमबी यांनी वरच्या घरात जावून दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

हा प्रकार सकाळी 11 वाजता उघडकीला आला. शेजारच्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांना त्वरीत खाली उतरवून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले. तपासणी अंती डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. शबनम यांच्या पश्चात पती, तीन आपत्ये आईवडील असा परिवार आहे.

शेजारच्या महिलेच्या आत्महत्त्येचा प्रभाव

मयत शबनमबी पिंजारी यांच्या घरा शेजारीच 3 महिन्यांपूर्वी एका विवाहीतेने अशाच पध्दतीने गळफास घेत आत्महत्या केली होती. तेव्हा पासून शबनमबी अधीकच विचारमग्न राहु लागल्या.

परिणामी सासरची मंडळी त्यांना एकटे सोडच नव्हते. त्यात त्यांची तब्बेत व्यवस्थित राहत नसल्याने शबनम बी या काही दिवस नशिराबाद येथे माहेरी आईवडीलांकडे राहील्या.

मात्र, पती इमाम पिंजारी ग्रामपंचायत निवडणूक लढवणार असल्याने त्या सासरी आल्या आणि पती बिनविरोध निवडून आले होते.

कोणाविरोधातही तक्रार नाही

शबनम बी यांच्या मृत्यूबाबत अद्याप कारण अस्पष्ट आहे, उपनिरीक्षक कदिर तडवी सहाय्यक फौजदार विश्वनाथ गायकवाड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असुन रुग्णालयात सासर व माहेरची मंडळींनी गर्दी केली होती. मात्र, दोन्ही पक्षाची काही एक तक्रार नाही. असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या