Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रउसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी 14 टक्के वाढ

उसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी 14 टक्के वाढ

पुणे –

उसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी 14 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. प्रतिटन 35 ते 40 रुपयांची वाढ मिळाली आहे. त्यानंतर कामगारांचा संप मागे घेण्यात आला आहे अशी माहिती साखर संघाचे अध्यक्ष

- Advertisement -

जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे. पुण्यात उसतोड मजुरांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, सुरेश धस हे सर्वजण उपस्थित होते. यावेळी राज्यातील ऊस तोडणी आणि ऊस वाहतूकदारांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

उसतोड कामगारांना 14 टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 35 ते 40 रुपये उसतोड कामगांना जास्त मिळतील. यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना 300 ते 359 कोटी रुपये त्यासाठी द्यावे लागणार आहे. अशी माहिती साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या