Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसामान्य रूग्णालयात काचेच्या पेटीची उपलब्धता

सामान्य रूग्णालयात काचेच्या पेटीची उपलब्धता

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

माता-बाल संगोपन हा शासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असून गर्भवती माता (Pregnant mother), तसेच 30 दिवसांपर्यंतच्या मुलांवर मोफत उपचाराची सुविधा (Free treatment) आहे. मुदतीपूर्व जन्म झालेल्या बालकांवर उपचार अत्यंत अवघड असतो.

- Advertisement -

अशा मुलांना काचेच्या पेटीत ठेवावे लागते. यासाठी खाजगी रूग्णालयात (Private hospital) दिवसाला हजारो रूपये मोजावे लागतात. त्यामुळे सामान्य रूग्णालयात इन्क्युबेटर (Incubator) काचेच्या पेटीची उपलब्ध करून देण्यात आलेली सुविधा सामान्य जनतेच्या उपयोगी पडेल, असा विश्वास कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी येथे बोलतांना केला.

येथील सामान्य रुग्णालयास शासनाकडून प्राप्त झालेल्या विविध आरोग्य सुविधांच्या (Health facilities) साहित्याचे लोकार्पण (Dedication) कृषिमंत्री दादाजी भुसे, महापौर ताहेरा शेख (Mayor Tahera Sheikh) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

उपमहापौर निलेश आहेर, कृउबा सभापती राजेंद्र जाधव, सखाराम घोडके, जे.पी. बच्छाव, प्रमोद शुक्ला, संजय दुसाने, रामा मिस्तरी, राजेश गंगावणे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हितेश महाले, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. योगेश पाटील, डॉ. शिलवंत, डॉ. राजेंद्र शिरसाठ, डॉ. पुष्कर आहेर, डॉ. सुमेध भामरे, डॉ. ओम जाधव, डॉ. आशिष अजमेरा, डॉ. विरेंद्र पाटील, अधिसेविका रेखा माळी, बेदमुथा, स्वाती जाधव यांच्यासह सामान्य रुग्णालयातील अधिकारी, सेवक उपस्थित होते.

लहान मुलांच्या 6 वॉरमर, 2 फोटो थेरपी युनिट (Photo therapy unit) व 10 लहान मुलांचे व्हेंटिलेटरचे लोकार्पण (Dedication of ventilator) कृषिमंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. 200 खाटांची क्षमता सामान्य रुग्णालयात (General Hospital) उपलब्ध असून भविष्यातील गरज लक्षात घेता कॅम्प भागातही लवकरच 100 खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती देतांना ना. भुसे म्हणाले, सामान्य रुग्णालयाची गरज लक्षात घेता या इमारतीचे अजून दोन मजले वाढवून खाटांच्या क्षमतावाढीसाठी प्रयत्न केले जातील.

स्थानिकांसह इतर भागातील करोनाच्या रुग्णांना मोठा दिलासा देण्याचे काम सामान्य रुग्णालकडून होते हे निश्चितच कौतुकास्पद आहे. रुग्णालयातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करून खाजगी रुग्णालयांप्रमाणे नियमीत स्वच्छतेवर भर द्यावा अशा सुचना त्यांनी शेवटी केली.

गोरगरिबांसाठी आरोग्य प्रशासन तत्पर : महापौर

करोनाची सुरुवात झाली त्यावेळेपासून आरोग्य प्रशासनाच्या सुविधा बळकट करण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे योगदान मोठे आहे. आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक घटकाने अहोरात्र मेहनत घेवून मालेगाव पॅटर्न (Malegaon pattern) चा नावलौकीक मिळविला आहे. सामान्य रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांसाठी चांगल्याप्रतीची आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहे. आज महिला व बाल रुग्णांसाठी चांगल्या उपकरणांची उपलब्धी ही नक्कीच कौतुकास्पद असल्याची भावना महापौर ताहेरा शेख यांनी व्यक्त केली.

कृषी मंत्री भुसे यांच्या प्रयत्नातून खासगी रुग्णालयापेक्षा चांगल्या प्रतीचा अतिदक्षता विभाग तयार झाला असल्याची माहिती देतांना सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हितेश महाले म्हणाले, सामान्य रुग्णालयातील इन्क्युबेटरच्या संख्येच्या दुप्पट नवजात बालके उपचारासाठी दाखल होत असल्याने एका वॉर्मरमध्ये काचपेटीत दोन अर्भके ठेवावी लागत असे, प्रत्येक बालकाचा आजार वेगळा असतो.

त्यामुळे एकाच पेटीत ठेवल्याने एकाचा दुसर्‍याला संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांना उपचार करणे जिकिरीचे जात होते. करोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता लहान बालकांसाठी व्हेंटीलेटर उपलब्ध झाले आहेत त्याचा नक्कीच फायदा होईल, अशी माहिती डॉ. हितेश महाले यांनी यावेळी दिली.

अकाली प्रसूती झालेल्या अर्भकात फॅटचे प्रमाण अगदीच कमी असते. त्यामुळे त्याच्या शरीरातील तापमान आवश्यक तितके राहात नाही. हे तापमान इन्क्युबेटरमध्ये मिळते. तापमान किती ठेवायचे याचा निर्णय डॉक्टर बाळाचे वजन व कितव्या महिन्यात जन्म झाला ते पाहून ठरवतात. इन्क्युबेटरमध्ये थर्मोस्टॅट यंत्रणा असल्यामुळे एकच तापमान कायम ठेवता येते. बाळाला हवी तितकी आर्द्रता ठेवता येते. यामुळे बाळ कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून दूर राहत असल्याची माहिती डॉ.महाले यांनी यावेळी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या