Thursday, April 25, 2024
Homeनगरकिशोरच्या पन्नाशीनिमित्त लेखकच सांगणार गोष्टी

किशोरच्या पन्नाशीनिमित्त लेखकच सांगणार गोष्टी

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

राज्यातील विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी सातत्याने प्रकाशित होऊन विद्यार्थ्यांचे भविष्य व समृद्ध करणारे किशोर आता पन्नास वर्षे पूर्ण झाली आहे

- Advertisement -

त्यानिमित्ताने दर शनिवारी किशोरगोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. लेखकच विद्यार्थ्यांना गोष्ट सांगणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील नामवंत बाल लेखक ऐकण्यास मिळणार आहेत.

किशोरवयीन मुलांसाठी बालभारतीच्या वतीने पन्नास वर्षापूर्वी किशोर मासिक सुरू करण्यात आले होते. गेले पन्नास वर्षे सातत्याने दरमहा हे मासिक प्रकाशित होत आहेत. महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिकांनी किशोर मध्ये सातत्याने लेखन केले आहे.

या मासिकामध्ये लिहिणारे अनेक नामवंत लेखक विद्यार्थ्यांना त्यांच्या गोष्टी सांगणार आहेत. पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुढील पन्नास आठवडे सातत्याने 50 लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार आहेत. महाराष्ट्रातील गेले पन्नास वर्षात अवांतर वाचनाच्या माध्यमातून अनेक मान्यवरांना गौरविले आहे.

मुलांना आवडतात गोष्टी

बालभारतीच्यावतीने किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने किशोर ची वर्गणी देखील कमी करण्यात आली आहे. पन्नास रुपयात विद्यार्थ्यांना वर्षभर अंक उपलब्ध होणार असून या निमित्ताने वर्षभर गोष्टी ऐकता येणार आहेत. याबाबत विद्यार्थ्यांना लेखक गोष्टी सांगत असल्यामुळे त्या मोठ्या प्रमाणावर भावत असल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रियेत नोंदविले आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना कथांचे भावविश्व समृद्ध होण्यास मदत होणार आहे.

किशोरच्या 50 शी निमित्त महाराष्ट्रातील नामवंत बालसाहित्यिक म्हणून राजीव तांबे, रेणू गावस्कर, महावीर जोंधळे, रवींद्र गुर्जर, मृणालीनी वनारसे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर गोष्टी सांगणार आहेत. या गोष्टी विद्यार्थ्यांना किशोर मासिकाच्या फेसबुक पेजवरती तसेच यु ट्यूब वरती देखील ऐकता येणार आहेत. यासाठी बालभारतीच्या पुण्याच्या स्टुडिओमध्ये गोष्टी ध्वनिमुद्रित करण्यात आल्या असून किशोर मासिकाकडे उपलब्ध असलेल्या 32 हजार पानाच्या मजकूरामधून या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी कथन करून ध्वनिमुद्रित करण्यात येत आहे.

-किरण केंद्रे, कार्यकारी संपादक किशोर

किशोर मासिकाने महाराष्ट्रातील अनेक पिढ्या समृद्ध केल्या आहेत. सध्याच्या पार्श्वभूमीवरती किशोर च्या वतीने सुरू करण्यात येणार्‍या किशोर गोष्टी या अभिनव उपक्रमाचे द्वारे विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्याबरोबर विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा जागृत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहेत. यातून विद्यार्थ्यांची मस्तक घडविण्यासाठी मदतच होणार आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन लेखकांच्या द्वारे गोष्टी ऐकण्याची संधी 50 आठवडे उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी पालक व शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

-दिनकर पाटील, संचालक बालभारती पुणे

- Advertisment -

ताज्या बातम्या