Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाभारतीय संघाला दुखापतीचं ग्रहण; बुमराहनंतर आणखी दोन खेळाडू दुखापतग्रस्त

भारतीय संघाला दुखापतीचं ग्रहण; बुमराहनंतर आणखी दोन खेळाडू दुखापतग्रस्त

दिल्ली | Delhi

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान तिसरा कसोटी सामना नुकताच सिडनी येथे पार पडला असून, आता सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याकडे वळले आहे. मालिकेत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत असून तिसरा सामना अनिर्णीत झाल्याने ब्रिस्बेन कसोटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र भारतीय संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे.

- Advertisement -

एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतीच्या चक्रात अडकत आहेत. दोन महिन्यापासून ऑस्ट्रेलियात असणाऱ्या भारतीय संघातील आतापर्यंत ९ खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. सिडनी कसोटीमध्ये जसप्रीत बुमराहाला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यातच आता मयांक आणि आर. अश्विन यांनाही दुखापत झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

नेटमध्ये सराव करताना मयांक अगरवालच्या हाताला दुखापत झाली आहे. मयांकची दुखापत गंभीर नसल्याचं बोललं जात आहे. मात्र, सामन्याआधी फिटनेस चाचणीनंतर निर्णाय होणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या हनुमा विहारीच्या जागी मयांकला संधी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं आहे. मात्र, आता मयांकही दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत भर पडली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी साडेतीन तास मैदानात फलंदाजी करत भारतीय संघाचा पराभव टाळणारा अश्विनही दुखापग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. सिडनी कसोटीनंतर अश्विनचा पाठदुखीचा त्रास वाढला आहे. बुमराह आणि अश्विन बॉर्डर-गावसकर मालिकेत भारताकडून सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहेत. आता बुमराहनंतर अश्विनलाही दुखापत झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. अश्विनला दोन दिवस पुर्णपणे आराम देण्यात येणार आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्याआधी बुमराह, मयांक आगरवाल आणि अश्विन यांची फिटनेस चाचणी होणार आहे. त्यानंतर अंतिम ११ जणांची निवड करण्यात येणार आहे.

१५ जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटीत वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असणार आहे. कारण बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये नवदीप सैनी, शार्दुक ठाकूर किंवा टी. नटराजन यांना घेऊनच भारतीय संघाला हा सामना खेळावा लागणार आहे. मधल्या फळीतील फलंदाज के.एल, राहुल यापूर्वीत दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे. आता हनुमा विहारीला दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे जास्त पर्याय नाहीत. खराब फॉर्मात असलेला पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांच्यावर टीम इंडियाची मदार असणार आहे. तसेच जाडेजाच्या जागी शार्दुल की कुलदीपला खेळवायचे यासाठीही डोकेफोड करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या