Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याबारसू आंदोलन, वारकऱ्यांवर लाठीचार्ज ते महापालिका निवडणुका; फडणवीसांनी विधानपरिषदेत सगळंच काढलं

बारसू आंदोलन, वारकऱ्यांवर लाठीचार्ज ते महापालिका निवडणुका; फडणवीसांनी विधानपरिषदेत सगळंच काढलं

मुंबई । Mumbai

सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवर फैलैवर घेतल्याचे पाहायाला मिळाले आहे. त्यावर आज विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

बारसू आंदोलनाला फंडिंग

फडणवीस म्हणाले, काही लोक ज्यांना या देशाचा विकास नको आहे, तिचं माणसं आपल्याला आरेच्या आंदोलनात, बुलेट ट्रेनच्या आंदोलनात, तीच माणसं बारसूच्या आंदोलनात आणि यातील काही माणसं नर्मदेच्या आंदोलनात देखील होती. माझा सवाल आहे की, आपण जर यांचा रेकॉर्ड ट्रेस केला तर वारंवार ही माणसं बंगळुरुला जातात यांच्या अकाऊंटमध्ये तिथून पैसे येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रीनपीस ज्या संघटना आहे त्यावर आपल्याकडं बंदी घातलेली आहे. त्याचे जे माजी सदस्य आहेत. त्यांच्या संपर्कात हे लोक असतात. त्यामुळं हे फक्त गावकऱ्यांपुरतं मर्यादित नाही. पुढची वीस वर्षे या राज्याची अर्थव्यवस्थेला आपण चालना देऊ शकतो त्याला विरोध करणं योग्य नाही. कोर्टात गेल्यानंतर कुठल्याही तक्रारदारानं मारहाण केल्याची आणि चुकीची वागणूक दिल्याची तक्रार केलेली नाही. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या गाडीत बसवून त्यांच्या घरी सोडण्यात आलं. त्यामुळं यावर होणारे आरोप योग्य नाहीत.

तीन कंत्राटदार व तीन विभाग बदलले तरी नगर-सावळीविहीर रस्त्याची दुर्दशा थांबेना

आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमार झालाच नाही

फडणवीस म्हणाले की, आळंदी येथे पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केलेला नाही. मागच्या वर्षी मंदिरात प्रवेश दिला, त्यावेळी महिला एकमेकांच्या अंगावर पडल्या होत्या. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नियोजित बैठक झाली होती. या बैठकीत वरिष्ठ पोलीस आधिकारी, आळंदी शहरातील काही प्रतिष्ठीत मंडळी आणि ५६ दिड्यांचे प्रमुख आणि मंदिराचे विश्वस्थ यांच्यामध्ये बैठक झाली.या बैठकीमध्ये ५६ दिंड्याना प्रत्येकी ७५ पास द्यायचं तसंच त्यांना प्रवेश द्यायचं ठरलं होतं. ते मंदिराबाहेर निघाल्यानंतर इतरांना दर्शनासाठी आत सोडायचं होतं. यासाठी सुरक्षा म्हणून तिथे काही बॅरिकेट देखील लावण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी जोग महाराज शिक्षण प्रशालेचे काही आजी-माजी विद्यार्थी आले. त्यांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. काहीही न ऐकता ते पोलिसांना तुडवून पुढे गेले. दरम्यान, पोलिसांनी त्यांना थांबवलं. पुन्हा बॅरिकेट पर्यंत आणलं. याच संपूर्ण घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे शेअर करण्यात आले. ही घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली. आम्ही सीसीटीव्ही तपासले असता, कुठेही लाठीचार्ज झाला नसल्याचं दिसून आलं, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

औरंगजेब हा भारतीय मुस्लीमांचा हिरो असूच शकत नाही

यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. औरंगजेबाच्या मिरवणुकी, स्टेट्स ठेवले गेले. एकाच वेळी अनेक जिल्ह्यात हा प्रकार झाला. हा काही योगायोग नाही. हा प्रयोग आहे. आजपर्यंत भारतीय मुसलमानांचा हिरो कधी औरंजेब नव्हता. या देशाचे हिरो छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजच होऊ शकतात. एपीजे अब्दुल कलाम होऊ शकतात. पण औरंगजेब होऊ शकत नाही, असं फडणवीस म्हणाले. ज्याप्रकारे संभाजी महाराजांचा छळ करून त्यांच्या शरीराचे तुकडे केले. तो औरंगजेब हिरो होऊच शकत नाही. टर्किक मंगोल वंशाचे भारत आणि पाकिस्तानात मिळून काही लाख लोक आहेत. त्यांचे वंशजही भारतात नाही. पण अचानक औरंगजेबाचं महिमामंडन सुरू झालं आहे. त्यामागे काही डिझाईन आहे. काही अटकाही केल्या आहेत. धर्माच्या आणि जातीच्या आधाराव भेदभाव करणार नाही. पण औरंगजेबाचं कोणी महिमामंडन करत असेलत तर सोडणारही नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

दूध दरवाढ धोरणामुळे दूध उत्पादकांचा तोटाच

लैंगिक गुन्हामध्ये महाराष्ट्र देशात १७ वा

फडणवीस म्हणाले, मुंबईत महिला अतिशय सुरक्षित आहेत. देशात दोन नंबरची महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. एक लाख लोकसंख्येमागे गुन्हे किती अशा पद्धतीची गणना केली जाते. एक लाख गुन्ह्यामध्ये महाराष्ट्राचे प्रमाण २९४.३% इतके आहे. या पद्धतीने महाराष्ट्र देशात दहावा आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ५४९३ गुन्ह्यांची घट आहे. महिलावर व बालकांवर अत्याचार यामध्ये महाराष्ट्र १२ व्या क्रमांकावर आहे. तर आसाम पहिल्या क्रमांकावर आहे. लैंगिक गुन्हामध्ये महाराष्ट्र देशात सतरावा आहे. महिला गायब होण्यामागे अनेक कारणे आहेत. २०२१ पर्यंत पाहिले तर गायब झालेल्या महिला पुन्हा येण्याचे प्रमाण हे ८७ टक्के आहे. २०२२ चा विचार केला तर ते प्रमाण ८० टक्के आहे. २०२३ जानेवारी ते मे २०२३ यामध्ये ६३ % महिला पुन्हा परत आलेल्या आहेत. २०१५ साली आपण मुस्कान मोहीम सुरू केल. आतापर्यंत ३४ हजार पेक्षा जास्त बालकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात पोलिसांना यश आले आहे. केंद्र सरकारनेसुद्धा याबाबत महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक केले आहे. किडनॅपिंगमध्ये महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर आहे. अंमली पदार्थबाबत सरकार फार गंभीर असल्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकांबाबत मोठं विधान

राज्यातील महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. सरकारमुळेच या निवडणुका रखडल्या असं विरोधकांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जाणीवपूर्वक सांगतो, मुंबई महापालिकेसहीत सर्व पालिकेच्या आम्हाला निवडणुका हव्या आहेत. आम्ही तयारीत आहोत. आम्हाला पाहिजे निवडणूक, पण सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे जाता येत नाही. तरीही आपल्याला वाटत असेल तर निवडणूक आयोग स्वायत्त आहे. निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. निवडणूक घेण्याचा अधिकार मुंबई महापालिका १८८८ कलम १८(१) अन्वये महापालिकेच्या सर्व निवडणुका घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोगाने ४ ऑगस्ट २०२२ अन्वये महापालिकेला सार्वत्रिक प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले आहेत. असे फडणवीस म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या