Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रउपचार सुविधा अधिक प्रमाणात वाढवणार : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

उपचार सुविधा अधिक प्रमाणात वाढवणार : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद – Aurangabad – प्रतिनिधी :

सध्या जिल्ह्यात स्थानिक रुग्णांसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातून गंभीर स्थितीतील कोवीड रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे…

- Advertisement -

त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील कोरोनाच्या उपचार सुविधांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात वाढ करण्यास प्राधान्याने सुरवात केली असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना उपाययोजनाबाबतच्या लोकप्रतिनिधी सोबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकरी चव्हाण बोलत होते.

यावेळी खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, मनपा आयुक्त अस्तिक पांडेय , पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्याची उपचार सुविधा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने विविध पध्दतीने प्रयत्न केले जात असून येत्या काळात रुग्ण वाढीची शक्यता लक्षात घेऊन पूरेशा प्रमाणात डॉक्टरांची उपलब्धता प्रामुख्याने वाढवण्यात येत आहे.

त्याचसोबत व्हेंटीलेटर, ऑक्सीजन पुरवठा, खाटांची संख्या, इंजेक्शन्स या उपचार सुविधा अधिक संख्येने वाढवण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच अनेक वेळा कोरोना रुग्ण हे विशिष्ट रुग्णालयात जाण्याचा आग्रह धरत असल्याने यंत्रणेला तातडीने उपचार सुरु करण्यात अडचणी निर्माण होतात त्यामुळे रुग्णांनी विशिष्ट रुग्णालयांचा आग्रह न धरता तातडीने उपचार घेण्यास सहकार्य करणे गरजेचे आहे, असे सांगून चव्हाण यांनी जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून 77.14 इतकी टक्केवारी आहे. तसेच मृत्यूदर 2.91% कमी करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.

हा मृत्यूदर शून्य टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिने विश्लेषणात्मक अभ्यासाद्वारे वेगळी उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले. तसेच खासगी रुग्णालयांनीही भविष्यातील रुग्णवाढ लक्षात घेऊन रुग्णांना उपचार तातडीने मिळण्याच्या दृष्टीने आपल्या सुविधा क्षमतांमध्ये वाढ करण्यासाठीच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील उपचार सुविधा बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून ग्रामीण भागातील व्हेंटीलेटरची उपलब्धता वाढवण्यात आली असून ज्या ठिकाणी अतिरिक्त व्हेंटीलेटर ग्रामीण रुग्णालयांना प्राप्त झाले आहेत. तेथील अतिरिक्त व्हेंटीलेटर घाटी आणि जिल्हा रुग्णालयात लावण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

तसेच घाटीमध्ये अधिक प्रमाणात रुग्णांना उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने त्याठिकाणी नॉन कोविड रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील आणि बाहेरुन येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उपचारसुविधांच्या बळकटी करणासाठी अतिरिक्त निधीची तातडीने व्यवस्था होणे गरजेचे असल्याचेही चव्हाण यावेळी म्हणाले.

मनपा आयुक्त पांडेय यांनी मनपाच्या उपाययोजनांची माहिती देऊन औरंगाबादमध्ये उपचार सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी इतर शहरांप्रमाणे वाढीव निधीची आवश्यकता असून डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी त्यांच्या वेतनात वाढ करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या