Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमशीद उघडण्याचा प्रयत्न

मशीद उघडण्याचा प्रयत्न

औरंगाबाद – Aurangabad – प्रतिनिधी :

शिवसेना आक्रमक झाल्यामुळे मंदिर प्रवेशाचं आंदोलन गुंडाळावं लागल्याने मशिदी सुरू करण्यासाठी निघालेले

- Advertisement -

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे एमआयएमचे मशिदी उघडण्याचं आंदोलन फसले. खासदार जलील यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी जलील यांना सोडून दिले.

खासदार इम्तियाज जलील यांनी १ सप्टेंबरला मंदिर आणि २ सप्टेंबरला मशीद उघडण्याचे आंदोलन जाहिर केले होते. या आंदोलनासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या इशाऱ्यानंतर मशिदीत १२.४५ लाच नमाज अदा करण्यात आली होती.

या आंदोलनासाठी शहागंजच्या बडी मशीदजवळ मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनापूर्वीच मशिदीत मोजक्या लोकांसोबत नमाज अदा केली. यामुळे खासदारांच्याही आंदोलनाची अडचण झाली. तरीही मशिदीत नमाज अदा करण्यासाठी निघालेल्या खासदार जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ताब्यात घेऊन इम्तियाज जलील यांना पोलीस आयुक्तालयात नेण्यात आले. दरम्यान एमआयएमचे काही कार्यकर्ते शहागंजच्या मशिदीजवळ आंदोलन करण्यासाठी जमा झाले. त्यांनी घोषणा बाजीही केली. जलील यांना अटक होताच, या कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्तालयाकडे धाव घेतली.

जलील यांच्यासह नासेर सिद्दीकी, फेरोज खान आणि अजीम अहेमदसह समीर साजेद यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात कार्यकर्ते जमा झाले. या ठिकाणी खासदारांना सोडेपर्यंत हलणार नसल्याच्या घोषणा देण्यात आल्या.

काही वेळानंतर खासदार जलील यांना पोलिसांनी सोडले. धार्मिक स्थळे उघडण्यासाठी औरंगाबादच्या आंदोलनाची दखल राज्य शासनाने घेतली नाही. तर आगामी काळात राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असलयाचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

खासदार जलील आणि प्रदेशकार्याध्यक्ष गफ्फार कादरी यांचे दोन गट असल्याची चर्चा होत होती. धार्मिक स्थळ उघडण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने दोन गटामधील नाराजी प्रकर्षाने समोर आली आहे.

प्रदेशाध्यक्षाच्या या आंदोलनात प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी व त्यांचे कार्यकर्ते अनुपस्थितीत होते. यामुळे एमआयएममधील अंतर्गत राजकारण यामुळे समोर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या