Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्ररेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून १६ लाखाचा गंडा 

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून १६ लाखाचा गंडा 

औरंगाबाद – Aurangabad – प्रतिनिधी :

रेल्वे खात्यामध्ये तिकीट तपासणीस पदाची (टीसी) नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दाखवून आणि पदाची बनावट नियुक्तीपत्रे देऊन एकाने तिघांना तब्बल १६ लाख रुपयांचा गंडा घातला.

- Advertisement -

यामागे एखादे रॅकेट असण्याची शक्यताही व्यक्त होत असून, या प्रकरणी अनिकेत कैलास कोकाटे (रा. देसवंडी, ता. राहुरी, जि. नगर) याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत नवनाथ खेडकर (वय ३२, रा. शनि मंदीरामागे, नवजीवन कॉलनी, एन-११, हडको) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. जुलै २०१८ मध्ये खेडकर हे पुण्याहून औरंगाबादकडे बसने येत होते. प्रवासात दरम्यान शेजारी बसलेल्या अनिकेत कोकाटे याच्याशी ओळख झाली.

त्यावेळी कोकाटेने दिल्लीतील रेल्वे भवनात नोकरीला असून, तेथे तिकीट तपासणीस पदाच्या जागा आमच्या कोट्यातून भरल्या जात आहेत. तेव्हा कोणाला नोकरी लावायची असेल, तर सांगा, अशी थापा मारली होती.

त्यानंतर कोकाटे याने आठ दिवसांनी खेडकर यांच्या मोबाइलवर संपर्क साधून, नोकरीचे काम करून देतो. तुमचा कोणी नातेवाइक अथवा ओळखीचा व्यक्ती असल्यास सांगा, असे म्हटले होते.

खेडकर यांनी नातेवाइक विशाल तुकाराम ताठे व सुनील विठ्ठल नागरे (दोघेही रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) यांच्याशी संपर्क साधून नोकरीसंदर्भात माहिती दिली. तेव्हा दोघांनी कोकाटे याच्याकडून सविस्तर माहिती घ्या असे खेडकर यांना सांगितले.

खेडकर याने कोकाटे याच्याशी संपर्क केला आणि दोनच दिवसांनी कोकाटेने औरंगाबाद गाठले. खेडकरच्या घरी गेल्यावर त्याने ताठे व नागरे यांच्याकडे शैक्षणिक कागदपत्रांची मागणी करत नोकरीसाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांची मागणी केली.

तडजोडीअंती प्रत्येकी आठ लाख देण्याचे ठरले. त्यानंतर पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने सप्टेंबर २०१९ मध्ये प्रत्येकी तीन लाख याप्रमाणे सहा लाख तर खेडकर यांनी स्वत: जवळील अडीच लाख असे एकूण साडेनऊ लाख रुपये कोकाटेला दिल्याचे फिर्यादीने नमूद केले.

त्यानंतर कोकाटे याने ताठे याला विमानाने दिल्लीतील रेल्वे भवनला बोलावून घेतले. १६ सप्टेंबर २०१९ रोजी ताठे हा नातेवाइक गोविंद ईप्पर सह दिल्लीत गेले.

दुसऱ्या दिवशी कोकाटे याने थाटेकडून त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांची झेरॉक्स घेतली. दोन दिवसांनी ताठेला वैद्यकीय तपासणीसाठी सोबत नेले. चार दिवसानंतर कोकाटेने २० सप्टेंबर २०१९ रोजी रेल्वेत नोकरी लागल्याचे नियुक्तीपत्र ताठे यास दिले.

त्यानंतर पुढे अनेक दिवस कोकाटे याने फिर्यादीसह त्या दोघा तरुणांना नोकरीसाठी झुलवत ठेवले. तसेच, नोकरी देण्यासाठी तसेच पैसे देण्यासही टाळाटाळ करू लागला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खेडकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या