Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली

श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मोबाईल व्हॉट्सअपवरील (Mobile WhatsApp) बहुचर्चित ऑडिओ क्लीप प्रकरणामुळे (Audio Clip Case) श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे (Shrirampur Taluka Police Station) पोलीस निरीक्षक मधुकर साळवे (Police Inspector Madhukar Salve) यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली (Control Room Transfer) करण्यात आली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस काॅन्स्टेबल वैरागर व पोलीस काॅन्स्टेबल राऊत यांच्यात आर्थिक वसुलीवरुन वाद झाल्याची मोबाईल व्हॉट्सअपवरील ऑडिओ क्लीप सर्वत्र व्हयरल झाल्यामुळे पोलीस खात्याची बदनामी झाल्यामुळे हे प्रकरण जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयापर्यंत जावून पोहचले. या क्लीपमध्ये पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचाही आवाज आला आहे.

पोलीस आधिक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणात दोन्ही पोलीस काॅन्स्टेबल यांना निलंबित केले आहे. तर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची अहमदनगर नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. मोबाईल व्हॉट्सअपवरील बहुचर्चित ऑडिओ क्लीप प्रकरण पोलीस निरीक्षक साळवे यांच्या अंगलट आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या