Thursday, April 25, 2024
Homeधुळेशिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी अतुल सोनवणे

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी अतुल सोनवणे

धुळे । Dhule । प्रतिनिधी

धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख (ग्रामीण) (District Shiv Sena Chief) म्हणून अतुल सोनवणे यांना संधी मिळाली आहे. या पदावर त्यांची तिसर्‍यांदा नियुक्ती (appointment) होत असून असे महाराष्ट्रात अपवादानेच घडल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

सन 1980 पासून श्री. सोनवणे हे शिवसैनिक म्हणून काम करीत आहेत. यापुर्वी त्यांनी नगरसेवक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होवून त्यांच्या आदेशाने गेली 42 वर्ष ते शिवसेनेत काम करीत आहेत.

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीत साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांचे पती डॉ. तुळशिराम गावीत यांचाही समावेश आहे. डॉ. गावीत हे सेनेचे विद्यमान जिल्हा प्रमुख होते. त्यांनी बंडखोरी केल्यामुळे रिक्त असलेल्या पदावर अतुल सोनवणे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी यापुवीं तब्बल 14 वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली असून त्यांच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि धुळे महापालिकेवर भगवा फडकला आहे. सध्या शिवसेनेच्या प्रतिकुल परिस्थितीत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, संपर्क नेते खा. संजय राऊत, रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून पुन्हा एकदा जिल्हा प्रमुखाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या