कांदा व्यापाऱ्याच्या घरी चोरीचा प्रयत्न

उमराणे | प्रतिनिधी | Umarane

घरमालक बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी संधी साधत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळा तालुक्यातील उमराणे (Umarane) येथे घडली आहे…

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील कांदा व्यापारी (Onion trader) प्रल्हाद अग्रवाल हे आग्रा येथे पर्यटनासाठी गेले असता चोरट्यांनी (thieves) ही संधी साधून काल रात्री मेनगेट, चैनल गेट, जाळीचा दरवाजा, मुख्य दरवाजा असे पाच कुलूप तोडल्यानंतर मुख्य दरवाजाला असलेले सेंट्रल लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला त्यामुळे चोरी करू शकले नाही.

दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रयत्न झाल्याचे घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याप्रकरणी देवळा तालुका पोलीस ठाण्याचे (Devla Taluka Police Station) पोलीस अधिक तपास करीत आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *