Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारट्रॅव्हल्स व्यावसायिकाचा उपप्रादेशिक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

ट्रॅव्हल्स व्यावसायिकाचा उपप्रादेशिक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडुन देण्यात आलेल्या साडेचार लाखाच्या दंडाला कंटाळुन ट्रॅव्हल्स व्यावसायीक आपल्या परिवारासह

- Advertisement -

अंगावर पेट्रोल ओतुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील रहिवासी अशोक मोतीराम पाटील यांच्या ट्रॅव्हल्स व्यवसाय असून गेल्या दिड वर्षापुर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून साडेचार लाखाचा दंड अशोक पाटील यांना देण्यात आला होता.

दरम्यान, आर्थिक परिस्थिती खराब असल्याने दंड भरण्यास सक्षम नसल्याने अशोक पाटील यांनी नंदुरबार परिवहन अधिकार्‍यांना सांगितले होते.

परंतु दंड भरण्यासाठी परिवहन कार्यालयाकडून सारखा तगादा लावण्यात येत होता. म्हणून दंड भरण्याच्या जाचाला कंटाळुन अशोक पाटील हे आपल्या पत्नी व मुलांसह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दाखल झाले त्यांनी एका खोलगी आपल्या परिवाराला बंद करून सर्वांच्या अंगावर पेट्रोल टाकत आत्महदनाचा प्रयत्न केला.

त्याच दरम्यन कार्यालयात एकच खळबळ उडाल्याने पोलीस निरीक्षक कळमकर आपल्या पथकासह दाखल झाले.

पोलीस निरीक्षक करमकर यांनी अशोक पाटील यांची समजूत काढत बाहेर येयाचे सांगितले. अशोक पाटील यांची समजूत काढत बाहेर येण्याचे सांगितले.

अशोक पाटील यांची समजुत निघाल्यानंतर परिवारासह खोलीच्या बाहेर पडले. त्यानंतर अशोक पाटील यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

याठिकाणी परिवहन विभागाचे अधिकारी व अशोक पाटील यांच्यात रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या