Sunday, April 28, 2024
Homeनगरमद्यधुंद तरुणाचा प्रांताधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न

मद्यधुंद तरुणाचा प्रांताधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न

संगमनेर | शहर प्रतिनिधी

महसूल अधिकार्‍यांकडे (Revenue Officer) वेळोवेळी विनवणी करूनही जमिनीचा वाद (Land dispute) निकाली निघत नसल्याने संतापलेल्या मद्यधुंद तर प्रांताधिकारी कार्यालयाच्या (Pratandhikari Office) गच्चीवर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न केला. शहर पोलिसांनी (Sangamner Police) त्याला वेळीच पकडल्याने त्याचा आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) फसला. ही घटना काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

पारनेर तहसीलदारांच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन भाजपा आक्रमक

सचिन माणिक गोर्डे (वय 24) रा. धांदरफळ, ता. संगमनेर (Sangamner) असे या तरुणाचे नाव आहे. काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तो मद्यप्राशन करून शहरातील नवीन नगर रस्त्यावरील (Navin Nagar Road) यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील इमारतीच्या (Yashwantrao Chavan Administrative Building) गच्चीवर चढला. मध्याच्या धुंदीत अधिकार्‍यांना शिवीगाळ करत त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी (Police) त्याला वेळेस अडविल्याने तो उडी मारू शकला नाही.

एका पोलीस अधिकार्‍याने त्याला शहर पोलीस ठाण्यात नेले. त्याची बाजू समजून घेऊन रात्री त्याला त्याच्या घरी सोडून देण्यात आले. या युवकाचा शेतजमिनीचा वाद आहे. याबाबत त्याने प्रांताधिकारी, तहसीलदार यांना वेळोवेळी पत्र दिले होते. मात्र याबाबत कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या या तरुणाने रात्री साडेआठ वाजता प्रांताधिकारी कार्यालयाच्या गच्चीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान या युवकाने रात्री उशिरा प्रांताधिकारी कार्यालयावर जाऊन उडी घेण्याचा प्रयत्न केल्याने या ठिकाणी नियुक्तीस असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला का अडविले नाही असा सवाल उपस्थित झाला आहे. या इमारतीमध्ये वेगवेगळे महत्त्वाचे शासकीय कार्यालय आहेत. रात्री अचानक कुणी या कार्यालयात घुसले तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या