Friday, April 26, 2024
Homeजळगावजंगलातून येत बिबट्याने केला हल्ला, मालकासमोरच फरफटत नेले वासरू

जंगलातून येत बिबट्याने केला हल्ला, मालकासमोरच फरफटत नेले वासरू

धानोरा Dhanora ता.चोपडा वार्ताहर

 येथून जवळच असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी (foot of Satpura) असलेल्या बढाई पाडा येथे गूरूवारी मध्यरात्री जवळील जंगलातून (forest) येवून बिबट्याने (leopard) घराबाहेर असलेल्या गोठयातून (cowshed) मालकासमोरच (owner) वासरावर हल्ला (Attack on calf) करून ठार (killed) करत जंगलात फरफटत नेल्याची  घटना घडल्याने परिसरात दहशत (terror) पसरली आहे.वनविभागातर्फे (Forest Department) कुंड्यापाणी परिमंडळाच्या वनपाल भावना पाटील (Forester Bhavna Patil) यांनी घटनेची पाहणी केली.

- Advertisement -

याबाबत सविस्तर असे की गुरूवारी रात्री बढाई पाडा सह जवळीलच सातपुडा जंगलात जोरदार पाऊस सुरू होता. विज ही गेली होती. अशातच मध्यरात्री बढाई येथील नाना भारसिंग बारेला यांच्या घराबाहेर बांधलेल्या जवळपास १५ ते २० गाई जोरजोरात हंबरडा फोडू लागल्या. त्यामुळे नाना बारेला यांना जाग आली व‌ त्यांनी बाहेर येवून बॅटरी ने पाहीले असता एका बिबट्याने त्यांच्या चार महिन्याच्या वासरावर हल्ला करून ठार केले होते व‌ त्याला ओढत नेत होता. सदरील दृश्य पाहून घाबरलेल्या बारेला यांनी आरडाओरडा केली.

मात्र चवताळलेल्या बिबट्यावर त्याचा काहीही परीणाम झाला नाही.‌‌ तो वासराला ओढत नेत जवळीलच जंगलात घेऊन गेला. सकाळी ही घटना संपूर्ण वस्तीसह परिसरात पसरली असता वासराचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थ जंगलात गेले. तब्बल १ कि. मी. सातपुडा जंगलातील कक्ष क्र.१५३ मध्ये हे वासरू अर्धवट खाल्लेले आढळून आले.

सदर शेतकर्ऱ्याचे सुमारे १० हजाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत वनविभागाला माहीत दिली असता कुंड्यापाणीच्या वनपाल भावना पाटील, वनरक्षक सुमित्रा बारेला, समीर तडवी यांनी जावून पाहणी केली व मदतीसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आव्हान केले. सदरील घटनेमुळे सातपुडा लगतच्या वाड्या वस्त्यांवर दहशत पसरली असून.सावधतेने राहण्याचे आवाहनही वनविभागाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या