Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबईत तीन दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देणाऱ्याला अहमदनगरमधून अटक, ATS ची कारवाई

मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देणाऱ्याला अहमदनगरमधून अटक, ATS ची कारवाई

मुंबई | Mumbai

मुंबईत तीन पाकिस्तानी अतिरेकी आले असल्याचा कॉल मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला आला होता. त्यामुळे पोलिसांसह राज्याची दहशतावाद विरोधी पथकाची यंत्रणा कामाला लागली होती. याचे रहस्य अखेर उलगडले असून अहमदनगरमधील एकाला अटक केली आहे. यासिन सय्यद असं आरोपीचं नाव असल्याचं कळतं.

- Advertisement -

आरोपीने गेल्या आठवड्यात मुंबईत दहशतवादी घुसल्याची मुंबई पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी आरोपीने दहशदवाद्याचे नावही सांगितले होते. मुजीब सय्यद नावाचा दहशवादी आला असून त्याचा मोबाईल क्रमांक आणि वाहन क्रमांकही पोलिसांना दिला. या अनुषंगाने पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली असता फोनद्वारे मिळालेली माहिती खोटी असल्याचे उघड झाले.

धक्कादायक! डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट; १८ हजार गायींचा होरपळून मृत्यू

यानंतर महाराष्ट्र एटीएसने फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक केली. तसेच त्याला पुढील कारवाईसाठी आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीने मुंबईत दहशतवादी आल्याचे फोन करण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी पोलीस आरोपीची चौकशी करत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमकावणारे आणि नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण करणाऱ्या फोनच्या घटना वाढल्या आहेत. यामागे एखादे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेऊन त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. मात्र, तरीही अशा प्रकारच्या घटना सुरूच आहेत.

अंगात पोलिसाचा गणवेश, पायात लाल शूज; फुकटेगिरी करणारा तोतया पोलीस गजाआड

- Advertisment -

ताज्या बातम्या