Monday, April 29, 2024
Homeनगरपेयातून गुंगीचे औषध; महिलेवर अत्याचार

पेयातून गुंगीचे औषध; महिलेवर अत्याचार

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

दीड महिन्यांपूर्वी सोशल माध्यम इन्स्टाग्रामवर ओळख झाली.जेवणाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलवून पेयातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार केल्याचा तसेच यातील अश्लिल फोटो समाज माध्यमावर प्रसारीत करून महिलेची बदनामी केल्याचा प्रकार पाथर्डी येथे समोर आला आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

सचिन सारुक (रा.येळी, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, संशयित सारुक व पीडितेची इन्स्टाग्रामवर तीन महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. फोनवरील संभाषण वाढून अधिक ओळख झाल्यानंतर 6 जुलै 2022 रोजी दोघांची पाथर्डीत बसस्थानकावर भेट झाली. तेथुन जेवणासाठी शेवगाव रस्त्यावरील एका हॉटेलमधे दोघे गेले. तेथे थंड पेयातून पिडीतेस गुंगीचे औषध देण्यात आले.

आरामाच्या कारणाने हॉटेलच्या लॉजच्या खोलीत पिडीतेस नेऊन संशयित सारूक याने तिच्यावर अत्याचार केले. यावेळी त्याने दोघांचेही नको त्या अवस्थेतील अश्लिले फोटो काढून ठेवले. यानंतर पुन्हा पिडीतेस त्याने बोलवण्याचा प्रयत्न केला. परंतु पिडीतने नकार देताच संशयिताने ते फोटो सोशल माध्यमांवर प्रसारीत करून तिची बदनामी केली. पाथर्डी पोलिसांनी संशयित सचिन सारुक यावर बलात्कार करणे, धमकी देणे व माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 67 (ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या