लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

jalgaon-digital
1 Min Read

सुपा (वार्ताहर)-

पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून दोन महिने दोन

वेगवेगळ्या लॉजवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत सुपा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत पीडित तरुणीने म्हटले आहे की, वाडेगव्हाण येथील एका तरुणाने मला लग्नाचे आमिष दाखवून 20 जुलै ते 15 सप्टेंबर या कालावधीत देवदैठण ता. श्रीगोंदा येथील सुप्रीम लॉज व सरदवाडी ता. शिरूर जि. पुणे येथील एका लॉजवर ठेवून माझ्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. याबाबत कोणास काही सांगितले तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही.

तुझ्या मुलांना सांभाळणार नाही व तुझी समाजात बदनामी करील, असा दम देत रहायचा, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी महिलेने तिच्या सासरची मंडळी भाया, दीर, जाव यांना सांगून शनिवारी (दि. 28) सुपा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. सुपा पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या माहितीवरून त्या तरुणाविरुध्द भा.दं.वि. कलम 376, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक माहिती पोलीस घेत आहेत.

सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राजेंद्र भोसले व सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *